Former minister Anil Deshmukh’s bail application was rejected by the special CBI court
माजी मंत्री अनिल देशमुख यांचा जामीनअर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयानं फेटाळला
अनिल देशमुखांची यंदाची दिवाळी तुरुंगातच
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख याच्याविरोधातील सीबीआयच्या गुन्ह्यातील जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला आहे.मुंबईतल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयानं आज माजी मंत्री अनिल देशमुख यांचा जामीनअर्ज फेटाळला आहे. भ्रष्टाचार आणि आपल्या पदाच्या गैरवापर केल्याचा आरोप केंद्रीय अन्वेषण संस्था- सीबीआयनं त्यांच्यावर ठेवला आहे.
४ ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या मनीलॉंडरिंग प्रकरणात जामीन मंजूर केला. त्याच आधारावर याही प्रकरणी जामीन मिळावा अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. मात्र सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस.एच गवलानी यांनी ती फेटाळली.
आपल्याला माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतल्या बार मालकांकडून १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. असा आरोप तेव्हा एका पोलिस अधिकाऱ्याने केला होता. या आरोपानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. आज न्यायालयाने देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानं त्यांची यंदाची दिवाळी तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
‘
मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी वसुलीबाबत माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर मुंबई हायकोर्टाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचा आदेश दिला.
प्राथमिक चौकशीअंती सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला. या एफआयआरच्या आधारे ईडीनेही अनिल देशमुख तसेच त्यांचा स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना अटक केली.
मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी म्हणून उकळलेली चार कोटी रुपयांहून अधिकची रक्कम देशमुख यांनी नागपूरस्थित आपल्या शिक्षण संस्थेत वळवून मनी लॉन्ड्रिंग केले, असा आरोप ईडीने ठेवला आहे. याप्रकरणी ईडीने त्यांच्यासह अन्य आरोपींविरोधात कोर्टात आरोपपत्रही दाखल केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com