शालेय अभ्यासक्रमामध्ये ऍनिमेशन, गेमिंग आणि व्ही एफ एक्स या विषयांचा समावेश केला जाणार

Apoorva Chandra, Secretary, Central Information and Broadcasting Department केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्र हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Animation, Gaming and VFX will be included in the school curriculum

शालेय अभ्यासक्रमामध्ये ऍनिमेशन, गेमिंग आणि व्ही एफ एक्स या विषयांचा समावेश केला जाणार

सुमारे पाच हजार चित्रपट आणि लघुपटांचं डिजिटायझेशन करण्याचा सरकारचा प्रयत्न

नवीन आशयपूर्ण मालिका येत्या महिन्याभरात सुरु होतीलApoorva Chandra, Secretary, Central Information and Broadcasting Department
केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्र
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मुंबई : ऍनिमेशन, व्ही एफ एक्स, गेमिंग आणि कॉमिक यासंदर्भातलं राष्ट्रीय ए व्ही जी सी धोरण आणि ए व्ही जी सी मिशन लवकरच केंद्र सरकार जाहीर करणार आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितलं. ते आज मुंबईत आयोजित फिक्की फ्रेम्स या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

ए व्ही जी सी धोरण संदर्भात चांगलं काम केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगण राज्यांचं कौतुक केलं. मुंबईत गोरेगाव इथल्या चित्रपट नगरीत राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन केलं जाईल, असं त्यांनी जाहीर केलं.

ए व्ही जी सी क्षेत्रातले स्टार्ट अप्स आणि इतरांसाठी सुमारे २०० कोटी रुपयांची उपकरणं तसंच बीज भांडवल निधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं दूरदर्शनवर मुलांसाठी खास वाहिनी सुरु करता येऊ शकेल, असं सांगत खासगी भागीदारानी दूरदर्शनसाठी ना नफा ना तोटा तत्वावर कार्यक्रमांची निर्मिती करावी. असं आवाहन त्यांनी केलं.

मुंबईत गोरेगाव इथल्या चित्रपट नगरीत राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन केलं जाईल, असं त्यांनी जाहीर केलं. महाराष्ट्र सरकारनं यासाठी २० एकर जमीन दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. सुमारे पाच हजार चित्रपट आणि लघुपटांचं डिजिटायझेशन करण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यादृष्टीनं वारसा चित्रपटांची यादी लवकरच तयार केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या यादीतल्या आपल्या आवडीच्या चित्रपटाच्या डिजिटायझेशनसाठी चित्रपटरसिक अर्थसहाय्य करू शकतात, त्यासाठी एक योजना सरकार बनवीत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सरकारनं या प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपये मंजूर केल्याचं ते म्हणाले. ओ टी टी माध्यमावरच्या कार्यक्रमांबाबतच्या १-२ तक्रारीच सरकारकडे आल्या असून बाकीच्या तक्रारीचं निवारण या उद्योगाची स्वनियामक संस्था करीत आहे, असं ते म्हणाले.

प्रसारभारतीमध्ये मोठे बदल घडवून आणले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. नवीन आशयपूर्ण मालिका येत्या महिन्याभरात सुरु होतील. अशी माहिती त्यांनी दिली. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी लाभ वाटून घेण्याच्या पद्धतीबाबत प्रसारभारतीशी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *