अण्णासाहेब मगर महाविद्यालय @ ५१

अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर Annasaheb Magar College Hadapsar हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

Annasaheb Magar College @ 51

अण्णासाहेब मगर महाविद्यालय @ ५१

मी १० वी ला  असतानाची गोष्ट आहे शाळा नुकतीच चालू झाली होती. १० वीचे  नवीन वर्ग झाले नव्हते ,  ५ वर्गा मध्ये विद्यार्थ्यांची विभागणी होणार होती. त्यामळे ५ वर्गामधील मधील विद्यार्थी एकत्र ४ वर्गामध्ये बसत होतो.  अशातच, भूमितीच्या तासाला यादवसर वर्गावर आले. यादव सर माझ्या भावाला ओळखत होते, त्या मुळे  त्यांनी मला विचारले मोठा भाऊ काय करतो , मी पटकन उत्तर दिले वॊशिंग्टन कॉलेजला आहे . 

सर्व वर्गात हशा पिकला, मला काय झालं ते कळलं नाही, त्या वेळी कॉलेजचं नाव कला वाणिज्य महाविद्यालय,   असं होत. पण गंमतीने सर्व जण वॉशिंग्टन कॉलेज म्हणतं असत. असे का म्हणत असत ते महा अजूनही माहीत नाही.  

आज याच कला वाणिज्य महाविद्यालयाची ओळख अण्णासाहेब मगर महाविद्यालय अशी आहे.   आज  हे केवळ कला व वाणिज्य महाविद्यालय न राहता अण्णासाहेब मगर महाविद्यालय हे एक मोठं शैक्षणिक संकुल बनून उभं आहे. 

बाबुराव घोलप यांनी पुण्याच्या ग्रामीण भागातील शिक्षणासाठी फार मोठे योगदान दिले आहे.  ग्रामीण भागातील  मुलांची  शिक्षणासाठी होणारी पायपीट थांबविणासाठी, बाबुराव घोलप यांनी ७ सप्टेंबर १९४१ रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना केली.  

या मुळे  ग्रामीणभागात अनेक शाळा सुरु झाल्या, अनेकांना शिक्षक म्हणून नोकऱ्या मिळाल्या.  थोडक्यात ग्रामीण भागाचा काया पालट होऊ लागला होता. या साठी अण्णासाहेब मगर यांनीही  या कार्यात बाबुराव घोलप यानां  मदत केली होती. 

हडपसर कला व वाणिज्य महाविद्यालयाची स्थापनाअण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर Annasaheb Magar College Hadapsar हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

अण्णासाहेबांनी  शेतकरी आणि सहकार क्षेत्रामध्ये  हवेली तालुक्यामध्ये मोठी चळवळ उभी केली.  पण याच विकासा  बरोबर  समाजाच्या विकासाचे सर्वात मोठे साधन म्हणजे शिक्षण.   

हडपसर भागात  प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची सोय होती, स्वतः अण्णासाहेबाचं माध्यमिक शिक्षण हडपसर मध्ये झालं, पण त्यांना सुद्धा उच्चं  शिक्षण पुण्यात घ्यावं लागलं. 

हडपसर मध्ये हरित क्रांती, सहकार चळवळ या बरोबर शैक्षणिक प्रगती व्हावी ही  अण्णासाहेबाची इच्छा होती. या तळमळीने त्यांनी बाबुराव घोलप आणि मामासाहेब मोहोळ याच्या सहकार्याने १५ जून १९७१ रोजी ‘कला व वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना केली. 

महाविद्यालयास इमारत नसल्यामुळे सुरवातीस हे महाविद्यालय हडपसर येथील ‘बंटर स्कूल’ च्या इमारती मध्ये १३३ विद्यार्थ्यानिशी सुरु झाल. 

पण अण्णासाहेब यावर समाधानी नव्हते,  कला आणि वाणिज्य शाखांबरोबरच विज्ञान शाखा सुरु व्हावी अशी त्यांची इच्छा होती.  महाविद्यालयास  स्वतःची प्रशस्थ सुंदर इमारत, मोठे मैदान आणि समृद्ध ग्रंथालय असावे असे त्यांना वाटत असे. 

अण्णासाहेब मगर यांनी ‘सुभाष सहकारी सामुदायिक शेतकी संघ’ या संस्थेकडे महाविद्यालयासाठी जागेची मागणी केली,  सुभाष सहकारी सामुदायिक शेतकी संघाने  अण्णासाहेबांच्या शब्दाला मान देऊन महाविद्यालयासाठी ५ एकर जागा वाजवी किमती मध्ये उपलब्ध करून दिली. 

अण्णासाहेब मगर महाविद्यालय

अण्णासाहेब मगर यांचे  अविरत प्रयत्न आणि परिश्रमाने १५ जून १९७१ रोजी हडपसर कला व वाणिज्य महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली. अण्णासाहेबांच्या या परिश्रमाची जाण ठेऊन संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष मा. प्रा. रामकृष्ण मोरे आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या महाविद्यालयाचे नामकरण “अण्णासाहेब मगर महाविद्यालय” असे करण्याचा निर्णय घेतला.

अण्णासाहेब मगर यांचे  अविरत प्रयत्न आणि परिश्रमाने १५ जून १९७१ रोजी हडपसर कला व वाणिज्य महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली. Hadapsar Arts and Commerce College was established on 15th June 1971 with the untiring efforts and hard work of Annasaheb Magar. हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News
अण्णासाहेब मगर

२० जानेवारी १९८४ रोजी नामदार यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मणिभाई देसाई यांच्या उपस्थित नामकरण समारंभ झाला. 

माझा अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्रवेश १९८३-८४ ला ११वीला झाला.  त्यावेळी जुनिअर कॉलेज दुपारी ११ वाजता असे. दहावीला  साधारण मार्क असल्यामुळे प्रवेश साठी मला बऱ्याच खेपा घालाव्या लागल्या. विशेष म्हणजे  माध्यमिक शाळेसारखी शिस्त आमच्या महाविद्यालयात होती. वर्गात  मुलांसाठी आणि मुलींसाठी बसण्यासाठी वेगळ्या रांगा  होत्या. 

हडपसर परिसरातील एकमेव कॉलेज असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील मुले-मुली दहावी नंतर अण्णासाहेब मगर महाविद्यालयातच प्रवेश घेत. या मुळे  बऱ्याच नवीन ओळखी झाल्या . 

ज्युनिअर  कॉलेजला अकाउंटस शिकवणारे आवारी सर, इंग्लिशचे कुलकर्णी आणि देवकर सर, अर्थशात्राच्या काकडे मॅडम, मराठीच्या देशपांडे मॅडम , पठारे सर रणपिसे सर याचे मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळाले. आमच्या मानात त्यांच्या विषयी भीतीयुक्त आदर होता. 

महाविद्यालयातील प्राध्यापक अतिशय आत्मीयतेने शिकवत असत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होऊ शकले. 

सिनिअर कॉलेजला शिकवणारे प्राध्यापक सुद्धा अभ्यासाशिवाय, सामन्यज्ञान व इतर व्यावसायिक दृष्ट्या उपयोगी गोष्टी शिकवत असत 

आमच्या महाविद्यालयात पदवी आणि पदवीत्तोर शिक्षणाची भाषा ही  मराठी होती,  बहुतांश मुलांच्या बाबतीत इंग्रजी भाषा हा प्रॉब्लेम होता, पण इंग्रजी भाषा जागतिक भाषा असल्यामुळे सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकांनी पदवीत्तोर परीक्षा इंग्रजी भाषेत देण्यासाठी प्रवृत्त करत असत. 

प्रा दिघे सर, प्रा वाल्हेर सर, ननावरे सर, क्रिडा प्रमुख बिर्ला सर, प्रा अ‍ॅड मोहन देशमुख प्राचार्य मा तू पवार सर , उप प्राचार्य गाढवे सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन होत होते

 सिनिअर कॉलेजला असताना  NSS (राष्ट्रीय सेवा योजना) मध्ये भाग घेणाची संधी मिळाली. NSS ला जाणायचे मुख्य आकर्षण होते डॉ. प्रा अर्जुनदास बात्रा सर.  बात्रा सर पांढरा शर्ट त्यावर जॅकेट आणि धोतर परिधान करीत. बात्रा सर मानसशास्त्र शिकवत. आम्ही कॉमर्सचे विद्यार्धी असल्यामुळे त्याचा फारसा परिचय नव्हता, पण NSS मुळे आम्हला त्याचे मार्गदर्शनाचा लाभ झाला.  

 बात्रा सर अभ्यासू व्यक्तिमत्त्व, विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने समजावून सांगत. विद्यार्थीप्रेमी प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती. योगाभ्यास आणि सेल्फडेव्हलोपमेंट्स वर त्यांची लेक्चर्स फार मोलाची आणि उपयुक्त  होती. याचाच फायदा पुढील आयुष्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात झाला. ते सांगत ‘तुम्ही जेवढा वेळ पण अभ्यास कराल तो पुर्णपणे एकाग्रतेने करा’,  एकाग्रतेने केलेली कोणती ही गोष्ट ही उत्तमच होत असते. आपण एकाग्रतेने केलेला अभ्यास हा तुमच्या कायम लक्षात राहील 

१९८९ ला पदवी घेतली आणि M Com ला प्रवेश घेतला, पण मी  माझ्या नोकरी मुळे M Com अर्धवट सोडले आणि कॉलेजशी संपर्क तुटला. 

अण्णासाहेब मगर महाविद्यालय २०२१-२२

मागीलवर्षी म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटे नंतर परत वर्ग मित्र प्रा संजय कामठे यांना  काही काम  निमित्त भेटण्यासाठी कॉलेजला गेलो होतो.  तर संपूर्ण कॉलेजचा कायापालट झालेला आढळला. 

एक मजली इमारत ते  शैक्षणिक संकुल असा बदल पहिला मिळाला. मी  सिनिअर कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना विज्ञान शाखा सुरु झाली होती.  विज्ञान शाखेत एक विशेष विषय (Special  Subject ) पुण्यामधील केवळ दोन महाविद्यालयात होता, आणि त्यातील एक म्हणजे अण्णासाहेब मगर महाविद्यालय.   

यामुळे पूर्वी या भागातील मुलं-मुलींना महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात जावे लागे पण आता पुण्यातील विद्यार्थी सुद्धा या महाविद्यालयात येऊ लागले. 

१९८३-८४ ला प्रवेश घेतला तेव्हा फक्त एकच इमारत होती आज प्रत्येक शाखे साठी स्वतंत्र इमारत आहे .  कॉलेज मधील सुविधा या अत्याधुनिक आणि  अद्ययावत आहेत. 

आम्ही कॉलेजला असताना विशेष विषय (Special Subjects) निवडताना मर्यादा होत्या,  कारण त्या वेळी इतर विशेष विषया  मध्ये निवडक विषय उपलब्ध होते, जसे  वाणिज्य शाखे साठी मार्केटिंग किंवा बँकिंग. पण  आता विशेष विषय निवडायला भरपूर वाव आहे. 

कला (Art)  वाणिज्य (commerce) आणि विज्ञान (Science) याबरोबर आय टी (IT ) कॉम्पुटर  (Computer) साठी  ११वी  पासून ते पदवी, पदवीत्तर शिक्षणाची सोय झाली आहे.  कला (Art)  शाखे साठी विविध  ७ विशेष विषया मध्ये ( Various Special Subjects)  BA आणि MA,  विज्ञान (Science) ९ विशेष विषयामध्ये BSc  आणि MSc  तसेच वाणिज्य (Commerce) शाखे मध्ये सुद्धा B Com /M Com BBA  विशेष विषय उपलब्ध आहेत. 

अत्याधुनिक सोई आणि  सुविधां असलेलं अण्णासाहेब मगर महाविद्यालय २०२२

आम्ही कॉलेजला असताना फारशा  सुविधा उपलब्ध नव्हत्या. पण गरजेच्या सर्व सुविधा उपलब्ध होत्या, त्यामुळे शिक्षणात कधीही अडचण आली नाही किंवा कॉलेजनी ती येऊ दिली नाही. 

कर्मचारी कक्ष (Staff Room )  ग्रंथालय,  खेळासाठी मैदान आणि लागणारे क्रीडा साहित्य , सायकल आणि  टु-व्हिलर स्टॅन्ड, आणि बऱ्यापैकी प्रसाधन गृह या सोई होत्या. वर्गामध्ये फॅन आणि लाइट ची गरज वाटली नाही. बऱ्यापैकी मोकळी जागा असल्यामुळे वर्ग हवेशीर होते. 

कॅन्टीनची कधीही उणीव भासली नाही, वेळ आलीच तर ‘पोपट बहिरट’ यांचे  गजानन उपहार गृह होते. चहा नाश्ता याची सोय होती. १ रुपया मध्ये वडापाव आणि चहा मिळत होता. त्यावरच समाधान होत होते. कधी कधी कॉलेजच्या प्राध्यापकाची गाठ येथे पडत असे. 

आज कॉलेजच्या आजूबाजूला चहा, कॉफी, स्नॅक्स, फास्टफूड इत्यादी सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. त्याच बरोबर बुटीक, इंटरनेट कॅफे, वेगवेगळे क्लास, अगदी कॉमर्स, सायन्स , MPSC, UPSC , CATचे क्लास याबरोबर स्टेशनरी आणि पुस्तकांची दुकाने आहेत  या सर्व सुविधा कॉलेज जवळ उपलब्ध आहेत. 

अत्याधुनिक सोई आणि  सुविधां 

आज  महाविद्यालयात NAAC मार्गदर्शक तत्त्वांनुसार  अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC- Internal Quality Assurance Cell), संस्थेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामगिरीमध्ये गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्याच्या दिशेने कार्य  करण्यासाठी संगणक आणि इंटरनेट सुविधांसह उपलब्ध आहे. 

प्रत्येक विभागात संगणक आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह स्वतंत्र कर्मचारी कक्ष (Staff  Room )प्रदान करण्यात आला आहे. संगणक आणि इंटरनेट सुविधांसह एचओडीसाठी स्वतंत्र केबिन आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. 

कॉलेजमध्ये प्रोजेक्टरसह सुसज्ज सेमिनार हॉल आणि पब्लिक अॅड्रेस सिस्टम उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी सामान्य खोली (Common Room for Students) तसेच 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या मुलींसाठी सामान्य खोली.(Common Room For Girl Students).

इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर पुरुष व महिला विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आहेत. विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या साठी प्रशस्त पार्किंग उपलब्ध आहे. सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी सदस्यांसाठी इंटरनेट आणि वायफाय सुविधा मोफत उपलब्ध आहे.

कॅन्टीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करते. कॅन्टीन सोयीस्करपणे स्थित आहे आणि विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात खाद्यपदार्थांची श्रेणी पुरविण्यात येतात.विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक मजल्यावर सेंट्रल वॉटर फिल्टर युनिट आणि वॉटर कुलर बसवण्यात आले आहेत. 

कॉलेजमध्ये प्रोजेक्टरसह सुसज्ज सेमिनार हॉल आणि पब्लिक अॅड्रेस सिस्टम उपलब्ध आहे. या सर्व सोई  सुविधांबरोबरच अत्याधुनिक व्यायामशाळा देखील महाविद्यालयाने मोफत उपलब्ध करून दिली आहे.

यशोगाथा 

अण्णासाहेबांची इच्छा होती की या महाविद्यालयलीत विद्यार्थी शहरातील कोण्यातही विद्यालयाच्या तुलनेत गुणवत्तेच्या दृष्टीने कमी पडत काम नयेत.  महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी अण्णासाहेबांची ही इच्छा  पूर्ण केली. 

प्रा हरी नरके, सचिन त्यागी, मछिंद्र कामठे असे सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी याच महाविद्यालयांतून तयार झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. 

महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने ही  महत्वपूर्ण योगदान दिले आहे, महाराष्ट्र शासनाचा मानाचा असा ‘श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’  मिळालेले ९ विद्यार्थी या महाविद्यालयातील आहेत. राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना  योजने मधील सुमारे ३० विद्यार्थी नवी दिल्लीतील  गणतंत्र परेड मध्ये सहभागी झाले होते. 

आज महाविद्यालयातील माजी विद्यार्थी  विविध सरकारी  विभागमध्ये प्रथम वर्ग अधीकारी (class one officer ) म्हणून कार्यरत आहेत.  या व्यतिरिक्त सहकार, सामाजिक ,शैक्षणिक, राजकारण आणि खासगी क्षेत्रामध्ये या महाविद्यालयातील यशस्वी झाले आहेत. 

मगर कुटुंबीयांची मदत 

आजची अण्णासाहेब मगर महाविद्यायाची नवीन वास्तू  अण्णासाहेब मगर यांचे पुतणे  सतीशदादा मगर यांनी महाविद्यालयास बांधून दिली आणि अण्णासाहेबांचा  वसा पुढे चालू ठेवला. ज दिनांक १५ जून २०२२ रोजी अण्णासाहेब मगर महाविद्यालय ५० वर्षे पूर्ण करून ५१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

 महाविद्यालयातील बऱ्याच विद्यार्थ्यांना कदाचित महाविद्यालयाच्या स्थापनेचा इतिहास माहित नसेल आणि  माझ्या माहिती प्रमाणे कोणत्याही वेब साईट वर या विषयांची माहिती नाही ती उपलब्ध व्हावी म्हणून हा लेख लिहिला.  तुमच्या कडे अजून काही माहिती असल्यास hadapsarinfomedi@gmail.com  या वर पाठवा. 

हा लेख तुम्हाला कसा वाटलं ते कंमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा.

हडपसर न्युज ब्युरो

 

 

 

संदर्भ : कर्मयोगी अण्णासाहेब मगर     काळ… व्यक्तित्व …कर्तृत्व     लेखिका :डॉ. सौ सीमा सागर काळभोर , विविध वृत्तपत्रे आणि ईंटरनेट

Spread the love

2 Comments on “अण्णासाहेब मगर महाविद्यालय @ ५१”

  1. खूप छान सर या विद्यालयाची मी एक विद्ार्थिनी आहे त्याबाबत मला खूप काही माहिती मिळाली तुम्ही हि माहिती खूप छान प्रकारे नमूद केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *