विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस आणि शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा

Vidhan Parishad Mumbai हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

Announcement of candidates from BJP, Congress and Shiv Sena for Vidhan Parishad elections

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस आणि शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस आणि शिवसेनेनं उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपानं प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी दिली आहे.Vidhan Parishad Mumbai हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

याशिवाय राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमा खापरे वगळता भाजपच्या सर्व उमेदवारांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले. उमा खापरे उद्या अर्ज भरणार आहेत. विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यांचं नाव अजून घोषित झालेलं नाही.

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेची उमेदवारी केंद्रीय नेतृत्व जाहीर करतं. त्यांच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडनवीस यांच्यासह आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. पण केंद्रानं काहीतरी भविष्यातील विचार केला असेल, असं पाटील यांनी सांगितलं.

काँग्रेसनं मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. ते उद्या अर्ज दाखल करणार आहेत.

तर शिवसेनेनं सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. तरुणांना संधी द्यायची म्हणून सुभाष देसाई यांनी विधान परिषदेची उमेदवारी नाकारली, असं पक्ष प्रवक्ते अरविंद सावंत यांनी सांगितलं. यावेळी शिवसेना नेते, मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, अनिल देसाई, दादा भुसे उपस्थित होते.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० तारखेला निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. १० जूनला अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १३ जूनपर्यंत आहे.

निवडणूक लढवली गेली तर २० जूनला सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. सदाभाऊ खोत, सुजीतसिंह ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड आणि दिवाकर रावते यांचा कार्यकाळ संपत असल्यानं तसंच रामनिवास सत्यनारायण सिंग यांचं निधन झाल्यानं या दहा रिक्त जागांसाठी विधानसभा सदस्यांकडून निवड केली जाणार आहे.

हडपसर न्युज ब्युरो

 

Spread the love

One Comment on “विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस आणि शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *