लोकप्रतिनिधींचा स्थानिक विकास निधी ५ कोटी रूपये- अर्थमंत्री अजित पवार

Finance Minister Ajit Pawar announces to increase local development fund of people’s representatives to Rs. 5 crore

लोकप्रतिनिधींचा स्थानिक विकास निधी ५ कोटी रूपये करण्याची अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : लोकप्रतिनिधींचा स्थानिक विकास निधी पाच कोटी रूपये करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. २०२२ – २३ च्या अर्थसंकल्पावर झालेल्या सर्वसाधारण चर्चेला उत्तर देताना तेDeputy Chief Minister Ajit Pawar. बोलत होते.

राज्यातली सोळा ट्क्के जनता मुंबई महानगर प्रदेशात राहते, मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असल्यानं विकासासाठी निधी वाढवून देण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.  ग्रामीण भागात देखील जिल्हा नियोजनामध्ये निधी वाढवून देण्याची गरज आहे. या शिवाय चार आकांक्षीत जिल्ह्यामध्ये देखील मागास भागांचा मानव विकास निर्देशांकांच्या प्रमाणात वाढीव निधी दिला जात असल्याची माहिती त्यानी दिली.

कोरोना संकटासह नैसर्गिक आपत्तीवर मात करुन राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.

राज्यातील जनतेवर करवाढीचा कोणताही बोजा न देता कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योगक्षेत्राच्या विकासाच्या पंचसुत्रीमुळे राज्याचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल.

अर्थसंकल्पात घेतलेल्या, प्रत्येक निर्णय आणि केलेल्या घोषणांची अंमलबजावणी सर्वशक्तीनिशी केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदारांचा स्थानिक विकासनिधी पाच कोटी करण्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली.

काश्मीर फाईल्स या सिनेमाला करमुक्त करण्याबाबतचा निर्णय राज्यापेक्षा केंद्रानं घेतल्यास तो देशाला लागू होईल असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा सदस्यांकडून घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाषणांत व्यत्यय न आणण्याबाबत तालिका अध्यक्षांनी भाजपा सदस्यांना समज दिली. त्यानंतर भाजपा सदस्यांनी सभात्याग केला.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *