अंमली पदार्थ विरोधी मोहिमेतील छाप्यात ३५० पेक्षा अधिक जणांना अटक

Maharashtra-Police. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

More than 350 people arrested in anti-narcotics campaign raids at various places in Mumbai

मुंबईत विविध ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेतील छाप्यात ३५० पेक्षा अधिक जणांना अटक

सुमारे ७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

Maharashtra-Police. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News
Image Source
en.wikipedia.org

मुंबई : मुंबई अमली पदार्थ मुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे ७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून गेल्या आठवडाभरात मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणांहून ३५० पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेमार्फत केलेल्या कारवाईत २ कोटी २४ लाख ५८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून एकूण ७ कोटी ४४ लाखांचा माल जप्त झाला आहे.

या मोहिमेला अधिक प्रभावीपणं राबविण्यासाठी ‘मिशन थर्टी डेज’ मोहिम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी अंमली पदार्थ मुक्त बैठकीत दिले. अमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढी बरबाद होत असून त्यापासून त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची मोहीम हाती घ्यावी. अमली पदार्थांची विक्री, पुरवठा करणाऱ्यांवर धडक कारवाई करावी, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

गेल्या आठवडाभरात मुंबई पोलिस, मुंबई महापालिका यांच्यावतीने अंमली पदार्थ विक्री करणारे पान ठेले, हॉकर्स, रेल्वे स्थानकांवरील हॉकर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयाजवळील सुमारे १३७१ पान ठेल्यांवर कारवाई करून हटविण्यात आले आहेत. कोटपा कायद्यांतर्गत ई सिगारेटस् प्रकरणी ७३९१ जणांवर कारवाई झाली आहे. पदपथावरील ६२६३ हॉकर्स आणि रेल्वे स्थानकांवरील २८१९ हॉकर्स विरुद्ध देखील या मोहिमेंतर्गत कारवाई झाली आहे.

यासंदर्भात जनजागृतीची मोहिम हाती घेण्यात आली असून मुंबई महापालिकेच्या ७ हजार शिक्षकांना या मोहिमेंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण दिल्याचं मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *