शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

Appeal for disposal of the pending application for the scholarship scheme

शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

पुणे : पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे ४ हजार ३०५ अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.

महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित असल्याने पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यास विलंब होत असल्याने महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तात्काळ निकाली काढण्याच्या सुचना समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी पोर्टल माहे डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत सन २०२१-२२ साठी ३९ हजार ८२६ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. अर्जाची छाननी करुन पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे यांच्या कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिल्याने अनुसूचित जातीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी महाविद्यालयांची असेल व संबंधित महाविद्यालयांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी कळविले आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *