निवृत्तीवेतनधारकांनी आयकर कपातीबाबत कोषागार कार्यालयास कळविण्याचे आवाहन

overnment of Maharashtra logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

Appeal for pensioners to inform Treasury office about income tax deduction

निवृत्तीवेतनधारकांनी आयकर कपातीबाबत कोषागार कार्यालयास कळविण्याचे आवाहन

पुणे : सन २०२२-२३ या वित्तीय वर्षासाठी आयकर कपातीस पात्र असणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी आयकर कपातीबाबत २२ सप्टेंबरपर्यंत कोषागार कार्यालयास कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.overnment of Maharashtra logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी स्वतःच्या उत्पन्नाची परिगणना करुन उर्वरित कालावधीत आयकर कपातीबाबत आयकर कायदा १९६१ पोटकलम ८० सी, ८० सीसीसी, ८० डी, ८० जी आदीनुसार करण्यात आलेली गुंतवणूक, बचतीबाबतची कागदपत्रे, पॅन कार्डची सत्यप्रत कोषागार कार्यालय येथे समक्ष जमा करावी किंवा to.pune@zillamahakosh.in या ई-मेल पत्त्यावर पाठवावे.

विहित कालावधीत आयकर कपातीबाबतची कागदपत्रे कोषागार कार्यालयास प्राप्त न झाल्यास निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनातून आयकराची कपात उर्वरित महिन्यांमध्ये करण्यात येईल याची नोंद घ्यावी. याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी केले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *