महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Appeal to apply for Mahatma Basaveshwar Social Equality-Shiva Award

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : वीरशैव- लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्थांना देण्यात येणाऱ्या ‘महात्मा बसवेश्वरmahatma-baseveshwar-हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News. Hadapsar News सामाजिक समता- शिवा पुरस्कार’ साठी २० एप्रिल २०२२ पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत यासाठी व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थांसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कारासाठी पात्रतेबाबतची नियमावली ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आली आहे. राज्य शासनाच्या संकेतस्थळावर संबंधित शासन निर्णय असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१९०३०८२०३९००३५२२ असा आहे.

२०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या चार वर्षाचे पुरस्कार प्रस्ताव एकत्रित घेण्यात येणार असल्याने इच्छुक व्यक्ती व संस्थांनी या चार वर्षासाठी चार वेगवेगळे अर्ज करावेत. अर्जासोबत नियमाप्रमाणे आवश्यक व योग्य ती माहीती जोडावी असे आवाहन समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *