पालखी सोहळ्यातील वाहनांची तपासणी करून घेण्याचे आवाहन

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा Shri Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Appeal to inspect the vehicles at the Palkhi ceremony

पालखी सोहळ्यातील वाहनांची तपासणी करून घेण्याचे आवाहन

पुणे : श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा २० जून रोजी आणि श्री क्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २१ जून रोजी सुरू होत असून सोहळ्यात सहभागी वाहनांची तपासणी १६ ते १९ जून या कालावधीत करून घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा Shri Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

पालखी सोहळ्यात जड आणि प्रवासी वाहने सहभागी होत असतात. वाहन नादुरुस्त होऊन अपघात होऊ नये यासाठी वाहनाची पूर्वतपासणी महत्वाची आहे.

त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने आळंदी रोड येथील चाचणी मैदान, दिवे येथील टेस्ट ट्रॅक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांच्या मोशी येथील कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

वाहन तपासणीच्यावेळी वाहनाची नोंदणी, कर, विमा, प्रदूषण नियंत्रण व योग्यता प्रमाणपत्र, परवाना व वाहतूक परवाना अशी सर्व कागदपत्रे मुदतीत असणे आवश्यक आहे.

वाहनाची विनामुल्य तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दिवे कार्यालयात सकाळी ११.३० ते ४.३० आणि आळंदी रोड येथे सकाळी ९ ते ११ आणि दुपारी ३ ते ५ यावेळेत तपासणी करण्यात येईल.

वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.अजित शिेंदे यांनी केले आहे.
हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *