नागरिकांनी नियमित रक्तदान करावे आणि गरजूंचे प्राण वाचविण्यासाठी सदैव तत्पर राहावे

Blood-Donation-Image

Health Minister appeals to citizens to donate blood regularly and always be ready to save lives of needy

नागरिकांनी नियमित रक्तदान करावे आणि गरजूंचे प्राण वाचविण्यासाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त( National Voluntary Blood Donation Day) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी सर्व नागरिकांनी नियमित रक्तदान करून गरजूंचे प्राण वाचवण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले आहे.

Blood-Donation-Image
Image Source: Pxfule.com

ते म्हणाले, रक्तदान हे एक उदात्त कार्य आहे आणि यातून भारतीय समृद्ध संस्कृती आणि सेवा आणि सहयोगाची परंपरा दिसून येते. नवी दिल्लीतील AIIMS येथे राष्ट्रीय रक्तदान दिन 2022 ला संबोधित करताना ते म्हणाले, रक्तदान अमृत महोत्सवाच्या यशामुळे मानवतेच्या उदात्त हेतूला बळ मिळाले आहे ज्यामुळे अनेक मौल्यवान जीव वाचविण्यात मोठी मदत होईल.

रक्तदान अमृत महोत्सवाची सुरुवात डॉ. मांडविया यांनी गेल्या महिन्याच्या १७ तारखेला सफदरजंग हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे रक्तदान शिबिरात रक्तदान करून केली.

रक्तदान अमृत महोत्सवांतर्गत दोन लाख पन्नास हजारांहून अधिक लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केले आहे. यावेळी मंत्री महोदयांनी ऐच्छिक रक्तदात्यांचा आणि रक्तदान मोहिमेदरम्यान अनुकरणीय कार्य करणाऱ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा सत्कारही केला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *