Invitation to apply for degree certificate of Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२२ व्या पदवीप्रदान समारंभासाठी पदवी प्रमाणपत्र प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी किंवा पदविका प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केले आहे.
एप्रिल/मे २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे असे आवाहन परीक्षा प्रमाणपत्र विभागाकडून करण्यात आले आहे. यासाठी १६ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत विद्यार्थी अर्ज करू शकतात. तर विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत ही १७ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत असणार आहे.
पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे असेही प्रमाणपत्र विभागाकडून सांगण्यात आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील convocation.unipune.ac.in या लिंकवर उपलब्ध आहे.
—-
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com