200 कोटी रुपयांचे ड्रग्ज घेऊन जाणारी पाक बोट पकडली

Indian Coast Guard भारतीय तटरक्षक दल हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Apprehended a Pak boat carrying Rs 200 crore worth of drugs

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरातच्या एटीएस अर्थात दहशतवादविरोधी पथकाने भारतीय जल हद्दीतून 200 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ घेऊन जाणारी पाकिस्तानी बोट घेतली ताब्यात

नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) आणि गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्तपणे कारवाई करत सुमारे 200 कोटी रुपये किमतीचे सुमारे 40 किलोग्रॅम अंमली पदार्थ नेणारी,  सहा जण असलेली  एक पाकिस्तानी बोट  भारतीय जलहद्दीतून  ताब्यात घेतली.Indian Coast Guard  भारतीय तटरक्षक दल हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

13-14 सप्टेंबर 2022 च्या मध्यरात्री भारतीय तटरक्षक दलाने  गुजरात एटीएसकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषा (आयएमबीएल) क्षेत्राच्या जवळच्या भागात गस्त घालण्यासाठी दोन वेगवान आंतररोधी  श्रेणीतील  – C-408 आणि C-454 – जहाजांना तैनात केले होते.

या जहाजांना आयएमबीएलच्या आत पाच नॉटिकल मैल आणि जखाऊपासून 40 नॉटिकल मैल भारतीय जलहद्दीत एक पाकिस्तानी बोट संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. खवळलेल्या समुद्राचा सामना करत तटरक्षक दलाच्या  जहाजांनी बोट अडवली आणि तिला ताब्यात घेतले.

पुढील संयुक्त तपासासाठी बोट जखाऊ येथे आणण्यात येत आहे. गेल्या एका वर्षात भारतीय तटरक्षक दल  आणि एटीएस, गुजरात यांनी केलेली ही पाचवी संयुक्त कारवाई आहे. किनाऱ्यावरचे सुरक्षा जाळे मजबूत असून त्याच्याशी संबधित यंत्रणांमध्ये असलेल्या प्रभावी समन्वयाचे महत्त्व या कारवाईमुळे अधोरेखित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *