Approval to distribute Chana Dal at subsidized rates to States and Union Territories
राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना सवलतीच्या दरात चणा डाळीचं वाटप करण्यासाठी मंजुरी
किंमत समर्थन आणि किंमत स्थिरीकरण निधी (PSF) अंतर्गत खरेदी केलेल्या डाळींच्या साठ्यातून हे वाटप करण्यात येईल. तसंच तूर, उडीद आणि मसूर यांच्या संदर्भात मूल्य समर्थन अंतर्गत खरेदीची मर्यादा सध्याच्या २५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे. या मंजूर योजनेंतर्गत, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रति किलो आठ रुपये सवलतीनं १५ लाख मेट्रिक टन चणे घेण्याचा प्रस्ताव दिला.
राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश मध्यान्ह भोजन, सार्वजनिक वितरण प्रणाली आणि एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांसह त्यांच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये या डाळींचा वापर करतील. १२ महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा चण्याच्या १५ लाख मेट्रिक टन साठ्याचं पूर्ण वाटप होईपर्यंत हे वितरण असेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्रसरकार १२०० कोटी रुपये खर्च करणार आहे.