Asia Cup 2022 will start from Saturday 27th August
आशिया चषक 2022 शनिवार 27 ऑगस्टपासून सुरू होणार
स्पर्धेसाठी व्ही व्ही एस लक्ष्मण भारतीय संघाचे हंगामी प्रशिक्षक
संयुक्त अरब अमिराती: २०२२ च्या आशिया चषक २०-२० क्रिकेट स्पर्धेची सुरुवात उद्या श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याने होणार आहे.
दुसरीकडे, गतविजेता भारत २८ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
ही स्पर्धा यापूर्वी श्रीलंकेत होणार होती परंतु तेथील आर्थिक संकटामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलविण्यात आली.
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आणि शारजाह क्रिकेट स्टेडियम या दोन ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ६ संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. आपापल्या गटात प्रत्येक संघ एकमेकांशी एकदा खेळणार.
या पहिल्या फेरीनंतर दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करतील, जेथे सर्व चार संघ एकमेकांविरुद्ध एकेकदा खेळतील.स्पर्धेचा अंतिम सामना११ सप्टेंबर रोजी होणार आहे.आकाशवाणी वरून या सर्व सामन्यांचे धावते समालोचन हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रसारित केले जाईल.
दुबईत होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी व्ही व्ही एस लक्ष्मण यांची भारतीय संघाचे हंगामी प्रशिक्षक म्हणून नेमणूक
संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या जाणाऱ्या आगामी एसीसी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची निवड करण्यात आल्याचं, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयन जाहीर केलं.
सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोविडची सौम्य लक्षणं आढळली असून, ते वैद्यकीय उपचाराधीन असल्यामुळे लक्ष्मण यांची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा भारतीय संघाच्या कर्णधारपदी आहे
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com