The Prime Minister flagged off Assam’s first Vande Bharat Express
आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला
रेल्वेच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे आणि नव्याने बांधकाम केलेल्या डेमू/मेमू शेडचे केले लोकार्पण
“ईशान्येच्या या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीमुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होईल”
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झेंडा दाखवून रवाना केले. ही वंदे एक्सप्रेस रेल्वे गाडी न्यू जलपायगुडीला गुवाहाटीशी जोडणार आहे आणि हा प्रवास 5 तास 30 मिनिटात होईल.
यावेळी पंतप्रधानांनी 182 रुट किलोमीटरच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे आणि आसाममध्ये लुमडिंग येथे नव्याने बांधण्यात आलेल्या डेमू/मेमू शेडचे लोकार्पण देखील केले.
यामुळे मेघालयात जाण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर धावणाऱ्या गाड्यांचा मार्ग मोकळा होईल.
गुवाहाटी- जलपायगुडी वंदे भारत ट्रेनमुळे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये अनेक शतकांपासून असलेल्या संबंधांना बळकटी मिळेल, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
केंद्र सरकारनं गरिबांच्या कल्याणाला प्राधान्य दिलं आहे, असं ते म्हणाले. पायाभूत सुविधांच्या विकासाचे सर्वात मोठे लाभार्थी पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्ये आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. पूर्वी ईशान्येकडील जनता अनेक दशके मूलभूत सुविधांपासून देखील वंचित होती, असे ते म्हणाले. 9 वर्षांपूर्वी वीज, टेलिफोन किंवा चांगल्या रेल्वे सुविधा, हवाई सुविधांचा अभाव असलेली खूप मोठ्या संख्येने गावे आणि कुटुंबे ईशान्येकडील होती, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
“भारतीय रेल्वे वेगासोबत मने, समाज आणि संधींना जनतेशी जोडणारे एक माध्यम बनले आहे”, अशी टिपणी पंतप्रधानांनी गुवाहाटी रेल्वे स्थानकावरील पहिल्या ट्रान्सजेंडर चहाच्या स्टॉलला अधोरेखित करत केली. समाजाकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा करणाऱ्यांना सन्मानाचे जीवन देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘एक स्टेशन, एक उत्पादन’ योजनेंतर्गत, ईशान्येकडील रेल्वे स्थानकांवर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत, त्यामुळे स्थानिक कारागिरांना आणि कारागिरांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होणार आहे; वोकल फॉर लोकलवर यामुळे भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्येतील शेकडो स्थानकांवर देण्यात आलेल्या वाय-फाय सुविधांचे उदाहरणही त्यांनी दिले. “संवेदनशीलता आणि वेगाने केलेले काम, या संयुक्त घटकांनीच ईशान्य प्रगतीच्या मार्गावर पुढे जाईल आणि विकसित भारताचा मार्ग प्रशस्त करेल, ‘’ असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com