दोन वर्षानंतर विद्यार्थ्यांसाठी आविष्कार स्पर्धा..!

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

‘Avishkar’ competition for students after two years..!

दोन वर्षानंतर विद्यार्थ्यांसाठी आविष्कार स्पर्धा..!

यंदा आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला: विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

पुणे :  विद्यार्थ्यांमधील संशोधन आणि नवविचारला चालना देणारी आविष्कार स्पर्धा यंदाच्या वर्षी दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा एकदा घेण्यात येणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्ष ही स्पर्धा होऊ शकली नव्हती.Savitribai Phule Pune University

मागील दोन वर्ष या स्पर्धा झाल्या नसल्याने यंदा मुलांना यावर्षी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तसेच आयोजनाचा मानही आपल्याला मिळाल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात यात सहभागी होत विद्यापीठाला आणखी उंचीवर न्यावे.
डॉ.संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल एस.एम.कृष्णा यांच्या प्रयत्नातून २००६ सालापासून ही राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा आयोजित केली जाते. यादांच्या वर्षीची आविष्कार २०२२ ही स्पर्धा १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये तसेच २५ ते ३० वर्ष जुन्या महाविद्यालयांमध्ये राबविण्यात यावी असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रक काढत महाविद्यालयांना केले आहे.

दरवर्षी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातून साधारण अकराशे विद्यार्थी तसेच प्राध्यापक या स्पर्धेत सहभागी होत असतात. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांनी केलेली अनेक चांगली व समाज उपयोगी संशोधने समोर आली आहेत.
– डॉ.सुप्रिया पाटील, संचालक
अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता आणि सिद्धता कक्षाच्या संचालक डॉ.सुप्रिया पाटील म्हणाल्या, ही स्पर्धा सुरुवातीला महाविद्यालय स्तरावर, त्यानंतर विभागीय स्तरावर, मग जिल्हा आणि त्यानंतर विद्यापीठ स्तरावर होते. या विद्यापीठ स्तरावरून मग राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत पदवी अभ्यासक्रम शिकणारे, पदव्युत्तर, संशोधनाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक देखील सहभागी होऊ शकतात. यातील विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकासोबतच शिष्यवृत्ती देखील देण्यात येते. या वर्षाअखेर यंदाच्या या अंतिम स्पर्धा होणे अपेक्षित आहे.

याबाबत अधिक माहिती विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेस्थळावर विद्यार्थ्याना पाहता येईल असे सहायक कुलसचिव श्रीकांत गायकवाड यांनी सांगितले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *