Three awards in the name of Dr Babasaheb Ambedkar
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे तीन पुरस्कार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज तर्फे अर्ज करण्याचे आवाहन
पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सर्वोत्कृष्ट ग्रंथ, सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता आणि सर्वोत्कृष्ट संशोधक हे तीन पुरस्कार जाहीर करण्यात आले असून या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक व्यापक पध्दतीने होण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी (१४ एप्रिल) हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
प्रत्येक पुरस्कारासाठी पाच हजार रुपये मानधन, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी मंगळवार दिनांक ५ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय खरे यांनी याबाबतची माहिती दिली.
संबंधितांनी यासाठी आपला अर्ज मा. विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११००७ या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत सादर करायचा आहे.
या पुरस्काराच्या पात्रतेचे निकष व अर्जाचा नमुना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर www.unipune.ac.in पाहता येईल.
अधिक माहितीसाठी
http://www.unipune.ac.in/dept/mental_moral_and_social_science/Babasaheb_Ambedkar_Studies/default.htm