Awareness Workshop on Germany Dual Degree Programme
जर्मनी ड्युअल पदवी कार्यक्रमाविषयी जागृतीपर कार्यशाळेचे आयोजन
पुणे : जर्मनी ड्युअल पदवी कार्यक्रमाबाबत प्रशिक्षणार्थ्यामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे 5 डिसेंबर रोजी 2.30 वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
जर्मनी देशाबरोबर भागिदारी करुन सुरू केलेला ड्युअल पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर स्पर्धाक्षम करण्यास उपयुक्त आहे. यामुळे हा अभ्यासक्रमाविषयी जागरुकता करण्यात येत आहे.
या कार्यशाळेत सन 2022 या शैक्षणिक वर्षामध्ये आद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून अन्न उत्पादन, फूड ॲण्ड बिवरेज सेवा, फिटर, मशिनिस्ट, टर्नर, इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रानिक्स, बिल्डिंग कंस्ट्रक्शन, प्लंबर, सुतार, वेल्डर अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेले प्रशिक्षणार्थी, किमान कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमामध्ये अन्न तंत्रज्ञान, बेकरी आणि कन्फेक्शनरी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कृषी, ऑटोमोबाईल या व्यवसायासह उत्तीर्ण झालेले तसेच द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी. तसेच वरील व्यवसायातील आजी-माजी प्रशिक्षणार्थी तसेच शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिसशिप) करत असलेल्या उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.
शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय व खाजगी तांत्रिक विद्यालयातील प्रशिक्षणार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी लियोस सॅगिटॅरियस कन्सल्टिंग (ओपिसी) प्रा.लि.च्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक कवी लुथरा (दू.क्र. 9920040042) व पी. एस. वाघ (दू.क्र. 9224324893) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com