‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला मिळालं ‘ढाल – तलवार’ हे निवडणूक चिन्ह

Eknath Shinde's party 'Balasahebchi Shiv Sena' got the election symbol 'Shield-Sword' एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला मिळालं ‘ढाल - तलवार’ हे निवडणूक चिन्ह हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Eknath Shinde’s party ‘Balasahebchi Shiv Sena’ got the election symbol ‘Shield-Sword’

एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला मिळालं ‘ढाल – तलवार’ हे निवडणूक चिन्ह

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष दोन गटात विभागला गेला आणि हा वाद न्यायालयातून निवडणूक आयोगाकडे गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. त्यामुळे दोन्ही गटांना आता स्वतंत्र नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यात आता शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले आहे. Eknath Shinde's party 'Balasahebchi Shiv Sena' got the election symbol 'Shield-Sword' एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला मिळालं ‘ढाल - तलवार’ हे निवडणूक चिन्ह हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला निवडणूक आयोगानं ‘ढाल – तलवार’ हे निवडणूक चिन्ह दिलं आहे.

एकनाथ शिंदे गटानं सूर्य हे चिन्ह मागितलं होतं. मात्र ते झोराम राष्ट्रीय पक्ष आणि द्रमुकशी संबंधित असल्यानं ते देण्यात आलं नाही. ढाल – तलवार’ हे निवडणूक चिन्ह पीपल्स डेमोक्रेटिक मुव्हमेंट पक्षाला यापूर्वी हे चिन्हं देण्यात आलं होतं. मात्र या पक्षाची मान्यता रद्द करण्यात आल्यानं हे चिन्हं एकनाथ शिंदेच्या पक्षाला निवडणूक आयोगानं दिलं.

ढाल तलवार आणि शिवसेनेचा इतिहास

शिवाजी पार्क या ऐतिहास मैदानात १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली होती. मी आज माझा बाळ महाराष्ट्राला अर्पण करत आहे, असं प्रबोधनकार ठाकरे हे आपल्या भाषणात म्हणाले होते आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना या संघटनेच्या झंझावाताला सुरुवात झाली.

मराठी माणसांच्या न्याय-हक्कांसाठी लढणारी संघटना, एवढ्यापुरतंच शिवसेनेचं उद्दिष्ट सुरुवातीच्या काळात मर्यादित होतं. मात्र पुढच्याच वर्षी म्हणजे १९६७ मध्ये शिवसेनेनं ठाणे नगरपालिकेची निवडणूक लढवली.

तसंच १९६८ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक मैदानातही बाळासाहेबांनी आपले उमेदवार उतरवले. या निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिलेदारांउमेदवाराचं चं चिन्ह होतं ढाल-तलवार.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *