Ban on single-use plastics
एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकवर बंदी
नवी दिल्ली : प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम (PWMR),2016,मध्ये संपूर्ण देशभरात पर्यावरण स्नेही पद्धतीने प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी वैधानिक रूपरेषा आहे.
चौतीस राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम, 2016 मध्ये केलेल्या सुधारणांनुसार , प्लास्टिक पिशव्या आणि/किंवा अन्य एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकच्या वस्तूंवर पूर्ण किंवा अंशतः बंदी घालण्याशी संबंधित नियमांबाबत अधिसूचना/आदेश जारी केले आहेत.
एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकचे उच्चाटन करण्यासाठी आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना मुख्य सचिव/प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष कृती दल स्थापन करण्याची विनंती करण्यात आली .
आतापर्यंत बत्तीस राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. मंत्रालयाने या संदर्भात राष्ट्रीय स्तरावरील कृती दल देखील स्थापन केले आहे. राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारे आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये/विभागांनाही सर्वसमावेशक कृती आराखडा विकसित करून त्याची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
चौदा राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि बारा केंद्रीय मंत्रालयांनी त्यांच्या सर्वसमावेशक कृती योजना आखल्या आहेत.
ई-कॉमर्स कंपन्यांना, एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिक विक्रेते/वापरकर्ते आणि प्लास्टिक कच्चा माल उत्पादकांना एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकच्या वस्तू टप्प्याटप्प्याने बंद करण्यासंदर्भात निर्देश जारी करण्यात आले आहेत.
प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन (PWM) नियम, 2016 नुसार, गुटखा, तंबाखू आणि पान मसाला साठवण्यासाठी, पॅकिंग करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या साहित्यावर पूर्ण बंदी आहे.
मोठ्या प्रमाणावर कचरा क्षमता आणि कमी उपयुक्ततेच्या आधारावर देखील मंत्रालयाने 12 ऑगस्ट 2021 रोजी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन दुरुस्ती नियम, 2021 अधिसूचित केला आहे, ज्यामध्ये 1 जुलै 2022 पासून खालील कमी उपयुक्तता आणि अधिक कचरा क्षमता असलेल्या एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर प्रतिबंधित केला आहे.
i प्लॅस्टिक काडी असलेले इअर बड्स, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टिक्स, आइस्क्रीम स्टिक्स, सजावटीसाठी पॉलिस्टीरिन [थर्मोकॉल] ;
ii प्लेट्स, कप, ग्लासेस, काटे, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे सारखी कटलरी , मिठाईचे खोके, निमंत्रण पत्रिका आणि सिगारेट पाकीट भोवती गुंडाळले जाणारे प्लास्टिक , 100 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, इत्यादी.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.
One Comment on “एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकवर बंदी”