Bangladesh defeated Netherlands by 9 runs in Cricket World Cup
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेशानं नेदरलंडचा ९ धावांनी पराभव केला
होबार्ट: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात बांग्लादेशानं नेदरलंडचा 9 धावांनी पराभव केला. सूपर ट्वेल फेरीसाठी दुसऱ्या गटात झालेल्या या सामन्यात नेदरलंडनं नाणेफेक जिंकून पहीलं क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला.
ठराविक अंतरानं बांग्लादेशाचे फलंदाज बाद करत नेदरलंडनं निर्धारीत 20 षटकांत बांग्लादेशाला144 धावांवर रोखलं. बांगलादेशकडून अफिफ हुसेनने सर्वाधिक 38 धावा केल्या तर बास डी लीडेने 29 धावांत 2 बळी घेतले.
विजयासाठी 145 धावांचा पाठलाग करणाऱ्या नेदरलंडनं आपल्या डावाच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन गडी गमावले.
नेदरलंडच्या कॉलीन अॅकरमन यानं 62 धावा केल्या, मात्र दुसऱ्या बाजूला ठराविक अंतरानं फलंदाज बाद होत गेल्यानं, नेदरलँडला निर्धारीत 20 षटकांमध्ये 9 गडी बाद 135 धावाच करता आल्या. बांगलादेशकडून वेगवान गोलंदाज ताक्सिन अहमदने चार बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 20 षटकांत 144/8 (अफिफ हुसेन 38; बास डी लीडे 2/29). नेदरलँड्स 20 षटकांत सर्वबाद 135 (कॉलिन अकरमन 62; तकसिन अहमद 4/25).
दुसऱ्या गटातच आज दक्षिण आफ्रिका आणि झिम्बावे यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात झिम्बावेनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र पावसानं व्यत्यय आणल्यामुळे सामना अद्यापही सुरू होऊ शकलेला नाही.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com