Banks should act with positivity, sense of responsibility and commitment with integrity
बँकांनी सकारात्मकता, जबाबदारीची जाणीव आणि वचनबद्धता ठेऊन सचोटीनं कार्य केलं पाहिजे – नितीन गडकरी
नागपूर : सामाजिक सुरक्षेच्या योजना राबवताना बँकांनी सकारात्मकता, जबाबदारीची जाणीव आणि वचनबद्धता ठेऊन सचोटीनं कार्य केलं पाहिजे, अस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर मध्ये आयोजित ‘विदर्भ क्षेत्राच्या आर्थिक समावेशन’ आढावा बैठकीत ते आज बोलत होते. या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
केंद्रीय अर्थमंत्रालय, राज्यस्तरीय बँकर्स समिती, जिल्हा अग्रणी बँक नागपूर यांच्यावतीने हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे “विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे आर्थिक समावेशन आढावा बैठक” आयोजित करण्यात आली. या बैठकीत तीनही मंत्र्यांनी बँकांनी सार्वजनिक हिताच्या योजनांसाठी काम करताना केवळ उद्दिष्टपूर्ती डोक्यात न ठेवता संवेदनशीलतेने कार्य करण्याच्या सूचना केल्या
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय),प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना(पीएमजेजेबीवाय),अटल पेन्शन योजना(एपीवाय), प्रधानमंत्री जनधन योजना (पीएमजेडिवाय), पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, किसान क्रेडिट कार्ड – पशुसंवर्धन, किसान क्रेडिट कार्ड -मत्स्यपालन, आदी महत्वाकांक्षी योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.विविध शासकीय योजनांमध्ये बँकांचा सहभाग आणि जनतेचा बँकिंग क्षेत्राशी संबंध, सहभाग, लाभ व त्या माध्यमातून आर्थिक सबळीकरणाबाबत आढावा घेण्याचा या बैठकीचा उद्देश होता.
बँकांनी कृषी ग्रामीण क्षेत्राशी निगडित कृषी उत्पादक कंपन्या आणि विदर्भातल्या मासेमार समुदायासोबत समन्वय साधून त्यांना किसान क्रेडिट कार्ड, मुद्रा, स्टँड अप इंडिया यासारख्या योजनांचा लाभ मिळवून दिला पाहिजे, असं ते म्हणाले.
लोकांमध्ये वित्तीय साक्षरता वाढण्यासाठी नाबार्ड सारख्या संस्थांनी वित्तीय साक्षरता व्हॅनच्याद्वारे या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन भागवत कराड यांनी यावेळी केलं. तर विदर्भात पीएम-स्वनिधी योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असून पथविक्रेत्यांना डिजिटल व्यवहार शिकवण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com