If 5G service is available in remote areas, better education will be facilitated – Prime Minister
दुर्गम भागात ५ जी सेवा उपलब्ध झाल्यास चांगल्या शिक्षणाची सोय होणार – प्रधानमंत्री
5 जी तंत्रज्ञान संपूर्ण भारतात परिवर्तन घडवून आणेल
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधे अदालजमध्ये मिशन स्कूल ऑफ एक्सलन्सची सुरुवात केली. यावेळी त्यांनी गुजरातनं शिक्षण पद्धतीत केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. गुजरातनं शिक्षणात ५जी च्या वापराचा विचार केल्याबद्दल त्यानी गुजरातचं अभिनंदन केलं.
मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स”चा प्रारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अडालज येथील त्रिमंदिर येथे “मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स”चा प्रारंभ केला. या मिशनची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी एकूण 10,000 कोटी रूपये खर्च होणार आहेत.
त्रिमंदिर येथील कार्यक्रमाच्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सुमारे 4260 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण केले. यामध्ये नवीन वर्गखोल्या, स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा आणि राज्यातील शाळांच्या पायाभूत सुविधांचे एकूणच अद्यतन करून गुजरातमधील शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यास मदत होणार आहे.
मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या प्रकल्पांवर पंतप्रधानांनी अधिक विस्ताराने सांगितले आणि या विद्यालयांमध्ये 50 हजार नवे वर्ग आणि एक लाखाहून अधिक स्मार्ट वर्ग उभारले जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान पुढे म्हणाले की या विद्यालयांमध्ये अनेक आधुनिक, डिजिटल आणि इतर भौतिक पायाभूत सुविधा तर असतीलच, पण त्याच सोबत, विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि त्यांचे शिक्षण यांमध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठीचे ते एक अभियान देखील असेल. “मुलांची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक पैलूबाबत येथे काम केले जाईल,”ते म्हणाले.
5 जी तंत्रज्ञान संपूर्ण भारतात परिवर्तन घडवून आणेल
अलिकडच्या काळात विकसित झालेल्या 5 जी तंत्रज्ञानाबाबत पंतप्रधान म्हणाले केली की, आम्ही इंटरनेटच्या पहिल्या चार ‘जनरेशन’चा, टप्प्यांचा वापर केला असला तरी, 5 जी तंत्रज्ञान संपूर्ण भारतात परिवर्तन घडवून आणेल. “याआधी आलेले प्रत्येक टप्प्यावरचे तंत्रज्ञान आपल्याला जीवनाच्या लहान- लहान पैलूंबरोबर जोडले आहे”, असे सांगून पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “अगदी याचप्रमाणे शाळांच्याही वेगवेगळ्या पिढ्या आपण पाहिल्या आहेत.” 5G तंत्रज्ञानाची क्षमता किती प्रचंड आहे, यावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, 5 जी तंत्रज्ञान शिक्षण प्रणालीमधील स्मार्ट सुविधा, स्मार्ट क्लासरूम आणि स्मार्ट शिकवण्यांच्या पलीकडे घेऊन जाईल आणि पुढील स्तरावर नेईल. “आमचे युवा विद्यार्थी आता शाळांमध्ये आभासी वास्तवाची शक्ती आणि आयओटी म्हणजेच ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ चा अनुभव घेऊ शकतात”. ‘मिशन स्कूल ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून गुजरातने संपूर्ण देशात पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे; याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या टीमचे अभिनंदन केले.
पंतप्रधान म्हणाले की, 5 जी तंत्रज्ञानाच्या आगमनाने या सर्व उपाययोजनांना मोठा लाभ होणार आहे कारण, या तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसह, देशातील सर्व विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण सामग्री, अध्यापन आणि शिक्षक उपलब्ध होणार आहेत. “शिक्षणाच्या पर्यायांतील वैविध्य आणि लवचिकता यांमुळे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्यक्षात उतरविता येईल,” ते म्हणाले. या नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आदर्श नमुना ठरणाऱ्या साडेचौदा हजार पीएम-श्री विद्यालयांबाबत देखील पंतप्रधानांनी माहिती दिली. या योजनेसाठी 27 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
प्रधानमंत्र्यानी गुजरात सरकारनं मागील २० वर्षात घेतलेल्या निर्णयांचं स्वागत केलं आहे. यामधे शाळा प्रवेशोत्सव आणि गुणोत्सव यांचा समावेश आहे. या निर्णायामुळे शिक्षण क्षेत्रात कमालीची क्रांती झाली असल्याचं ते म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com