भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इमारतीचा कायापालट होणार

The building of Bharat Itihas sanshodhak Mandal will be transformed भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इमारतीचा कायापालट होणार हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The building of ‘Bharat Itihas Sanshodan Mandal’  will be transformed

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इमारतीचा कायापालट होणार

The building of Bharat Itihas sanshodhak Mandal will be transformedभारत इतिहास संशोधक मंडळाच्या इमारतीचा कायापालट होणार
हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
Image Source : https://commons.wikimedia.org/

पुणे : शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ इतिहासाशी संबंधित लाखो कागदपत्रं जतन करणाऱ्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इमारतीचा कायापालट होणार आहे. आता संस्थेच्या नूतनीकरण प्रकल्पाला सुरुवात होणार असून यासाठी ‘मायदेश फाउंडेशन’चे अरुण जोशी यांनी अडीच कोटी रुपयांचं अर्थसाह्य केलं आहे.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी सात जुलै 1910 रोजी स्थापन केलेल्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इमारतीच्या नूतनीकरणाविषयी मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे म्हणाले एखाद्या वास्तूच्या जीवनामध्ये त्याला कुठेतरी जीर्णोद्धार किंवा त्याच नुतूनीकरण करण्याची आवश्यकता असते तशीच गरज या इमारतीच्या बाबतीत घडली आता ही इमारत 100वर्षांपूर्वी ची आहे परंतु ही इमारत एक उत्तम अशा वास्तू कलेचा नमुना आहे फार सुंदर इमारत आहे तिचं जे मूळ स्वरूप ते कायम ठेवून तिच्यामध्ये हवे ते बदल करणे आणि तिच आयुष्य वाढवणं तिची दुरुस्ती करणे हे आवश्यक होतं.

एक वर्षांमध्ये हे सगळं कार्य पूर्ण होईल आणि त्यामध्ये जे राजवडे सभागृह पुण्यात भूषण आहे त्याचे एक आधुनिक रूप आपल्याला पाहायला मिळल त्याच बरोबर या इमारतीत अनेक दालन आहेत मग हे कार्यालयाचे दालन आहे किंवा इतर मोडी चे वर्ग किंवा परीक्षांचे वर्ग घेत काही तिचा अभ्यास वर्गासाठी लागणाऱ्या हॉल असतील त्याचबरोबर संशोधकांना आपला रिसर्च करण्यासाठी लागणारे खोल्या असतील असं त्याचं स्वरूप असेल त्यामुळे निश्चितच मोठ्या प्रमाणात मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणारे अभ्यासक पुढच्या काळामध्ये इथे येत राहतील

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *