Bharat Jodo Yatra of MP Rahul Gandhi entered the Hingoli district
खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल
काँग्रेसचे माजी खासदार स्वर्गीय राजीव सातव यांच्या आठवणीत राहुल गांधी भावूक
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात काल राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले होते. रात्रीच्या मुक्कामानंतर आज सकाळीच सहा वाजता राहुल गांधी यांची भारत जोडो सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत नाना पटोले, एच के पाटील, विश्वजीत कदम पायी चालत आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेला कळमनुरीमध्ये चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे आज या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले.
काँग्रेसचे माजी खासदार स्वर्गीय राजीव सातव यांच्या आठवणीत राहुल गांधी भावूक झाले.राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रा काल दुपारी हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली. हिंगोलीचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण करत राहुल गांधी भावूक झाले.राहुल यांनी जुने सहकारी राजीव सातव यांचे नाव घेताच उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.
भारत जोडोमध्ये पायी चालणं राज्यातील अनेक नेते मंडळींना शक्य होत नाही. तब्बेतीमुळं अनेकांनी राहुल गांधी यांच्यासोबत चालण्याचं टाळलं आहे. परंतू यात राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत, ते नाना पटोले.
तेलंगणामधून महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा दाखल झाल्यापासून नाना पटोले राहुल गांधींसोबत सतत चालत आहेत. सर्व सत्रातील लोक राहुल गांधी यांच्यासोबत चालत असल्याचे पटोले म्हणाले. राज्यातील काही नेत्यांना तब्बेतीची अडचण असल्यामुळं चालत नसल्याचे पटोले म्हणाले. मी शेतकरी आहे चालताना माझे पाय दुखत नाहीत असेही ते म्हणाले. दिवंगत राजीव सातव यांनी आम्ही सगळेजण मिस करत असल्याचे पटोले म्हणाले.
त्यापूर्वी राहुल गांधी यांनी आज भोकर मतदार संघात अर्धापूर नजिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नागोराव इंगोले यांनी खासदार गांधी यांच्याशी बोलताना, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर शेतीसाठी मोफत वीज पुरवठा करावा अशी मागणी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विद्यार्थी नेते कन्हैया कुमारही या यात्रेत सहभागी झाले आहेत. नांदेड – हिंगोली मार्गावर अनेक ग्रामस्थ यात्रेच्या स्वागतासाठी रस्त्याच्या कडेला उभे होते. वन रँक वन पेन्शन’ची मागणी,बालविवाह या प्रश्नाविषयीही अनेकांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com