Bilateral talks between Prime Minister Narendra Modi and US President Joe Biden
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात द्विपक्षीय चर्चा
नवी दिल्ली : भारत-अमेरिका मैत्री पुढील २५ वर्षांच्या भारताच्या विकास प्रवासाचा अविभाज्य भाग असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
युक्रेनमधली युद्धस्थिती बिकट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.
युक्रेनमधल्या जनतेच्या सुरक्षेला भारतानं सर्वोच्च प्राधान्य दिलं असून त्या देशाला औषधं आणि इतर मदत साहित्याचा सातत्यानं पुरवठा केला जात आहे, असं मोदींनी यावेळी सांगितलं.
रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या चर्चेतूनच वादावर तोडगा निघेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ज्यो बायडेन यांनी पदाची सूत्र हाती घेतानाच लोकशाहीच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारी घोषणा केली होती,त्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचं कौतुक केलं आणि भारत आणि अमेरिकेतल्या भागीदारीचं यश हे ती घोषणा अधिक अर्थपूर्ण बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, असं सांगितलं.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले की, भारत आणि अमेरिका ही दोन सशक्त लोकशाही आहेत जी मजबूत आणि वाढणारी प्रमुख संरक्षण भागीदारी सामायिक करतात. ते म्हणाले की, भारत-अमेरिका भागीदारी आणखी मजबूत होत राहावी यासाठी सतत सल्लामसलत आणि संवाद ही गुरुकिल्ली आहे.
मोदी आणि बायडेन यांच्यात यावेळी कोरोना संकट, जागतिक अर्थव्यवस्था, पर्यावरण बदल, हिंद –प्रशांत क्षेत्रातल्या घडामोडी आणि युक्रेनमधली स्थिती याबाबत चर्चा झाली.
Hadapsar News Bureau.