भारतीय मानक ब्यूरो उत्पादनांच्या दर्जाला प्रोत्साहन देणारी मोहीम अधिक तीव्र करणार

BIS to intensify Standards Promotion activities through engagement of Consumer Organizations and NGOs

ग्राहक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने, भारतीय मानक ब्यूरो उत्पादनांच्या दर्जाला प्रोत्साहन देणारी मोहीम अधिक तीव्र करणार

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, सुरु असलेल्या ‘आयकॉनिक वीक’ चा भाग म्हणून भारतीय मानक ब्यूरोच्या मुख्यालयात एक वेबिनार आयोजित करण्यात आले होते. ग्राहक संघटना आणि स्वयंसेवीBureau of Indian Standards संस्था देखील या वेबिनार मध्ये सहभागी झाल्या होत्या.

वेबिनारचे उद्घाटन करतांना बीआयएस चे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी जगाच्या विविध भागात ग्राहक चळवळीची उत्पत्ती कशी झाली आणि उत्पादनांचा दर्जा सुधारण्यात, या चळवळीचे कसे योगदान होते, याची माहिती दिली. तसेच, उत्पादनांचा दर्जा उत्तम राखण्यासाठीही ग्राहक संघटना आणि स्वयंसेवी संस्था किती महत्वाच्या आहेत, याचीही त्यांनी माहिती दिली. या संस्था, सरकार, नियामक मंडळे आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून काम करतात, असे सांगत, उत्पादनांच्या दर्जाविषयीची जनजागृती मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

या वेबिनार ला ग्राहक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांचे 200 पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. ‘थिंक, नज अँड मूव्ह’ विभागाचे प्रमुख चंदन बहल यांनी उपस्थित प्रतीनिधींना बीआयएस च्या उत्पादन दर्जाविषयक उपक्रमांची माहिती दिली. या क्षेत्रांत ग्राहक संघटना, स्वयंसेवी संस्था कुठे कुठे योगदान देऊ शकतात, हे ही सांगितले. बीआयएस ने या मोहिमेत ग्राहकांना सहभागी करुन घेण्यासाठी अलीकडेच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांविषयी त्यांनी माहिती दिली. यात, उत्तम गुणवत्ता जनजागृती क्लब, जनजागृती कार्यक्रम, घरोघरी जाऊन मोहीम राबवणे अशा उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.

बीआयएस ने अलीकडेच, ग्राहकांना सहभागी करुन घेणारे पोर्टल सुरु केले असून, ते देखील आजच्या वेबिनारमध्ये दाखवण्यात आले. या पोर्टलवर ग्राहक संघटना सहज नोंदणी करु शकतात आणि स्वयंसेवी संस्था देखील त्यांचा विशिष्ट एनजीओ दर्पण ओळखक्रमांक आणि पॅन कार्ड नंबर वापरुन ही नोंदणी करु शकतात. यावेळी, बीआयएस ने जारी केलेल्या प्रक्रियांशी संबधित मार्गदर्शक सूचना आणि बीआयएस च्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष माहिती यावेळी देण्यात आली.

ग्राहक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी देखील यात सक्रिय सहभाग घेतला. बीआयएस च्या सहकार्याने देशभरात उत्पादनांच्या दर्जा आणि गुणवत्तेविषयी प्रचार करण्यास उत्सुक असल्याचे या संघटनांनी सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *