Amit Shah claims that BJP has no competition in the 2024 general elections
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमधे भाजपाला कोणाची स्पर्धाच नाही असा अमित शाह यांचा दावा
निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
नवी दिल्ली : २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांमधे भाजपाला कोणाची स्पर्धाच नाही असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. ते आज दूरदर्शनशी मुलाखतीत बोलत होते.
जम्मू काश्मीरमधे निवडणुका झाल्यावर राज्याचा दर्जा दिला जाईल असं ते म्हणाले. देशात दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, असं सांगून ते म्हणाले, गेल्या ९ वर्षांत बिहार आणि झारखंडमधून डाव्या विचारसरणीचं जवळजवळ उच्चाटन झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारत जी-२० चं अध्यक्षपद भूषवत आहे आणि जी-२० शिखर परिषदेचं श्रेय त्यांना मिळालं पाहिजे, असा आग्रह शाह यांनी धरला.
श्री शाह म्हणाले की, कर्नाटकात पक्ष पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत येईल.
जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्याचा दर्जा पुनर्स्थापित करण्याबद्दल बोलताना, श्री शाह म्हणाले की त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की निवडणुकांनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्याचा दर्जा बहाल केला जाईल. ते पुढे म्हणाले की यूटीमध्ये मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे आणि निवडणूक आयोगाला निवडणुकीचा निर्णय घ्यावा लागेल.
कलम ३७० वर, श्री शाह म्हणाले, १९५० पासून जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवणे आमच्या अजेंड्यावर होते. ते पुढे म्हणाले की, कलम ३७० रद्द केल्यानंतर विकास कामे वेगाने होत आहेत आणि केंद्रशासित प्रदेशात दहशतवादी कारवायाही लक्षणीय प्रमाणात कमी झाल्या आहेत.
त्रिपुरातल्या आगामी निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल,भाजपाच्या जागा आणि मतांचा टक्का दोन्हीमधे वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना दहशतवादी विचार आणि साहित्याचा प्रसार अशा देशविघातक कारवाया करीत असल्या कारणाने तिच्यावर बंदी घातल्याचं ते म्हणाले.
भाजपा सरकारने अनेक अतिरेकी संघटना आणि गटांशी समझोता करार केल्यानंतर ईशान्येकडच्या राज्यांमधे आता शांतता आहे असा दावा त्यांनी केला. सुमारे आठ हजार अतिरेकी शरणागती पत्करुन मुख्यप्रवाहात सामील झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
पूर्वी आंदोलनं, जाळपोळ, स्फोट अशा कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडच्या राज्यांमधे आता रस्ते, रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास होत आहे असं ते म्हणाले. त्रिपुरा विधानसभेसाठी येत्या गुरुवारी १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com