BJP should not contest elections against Rituja Latke
ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपानं निवडणूक लढवू नये
अंधेरी-पूर्व विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या विरोधात निवडणूक न लढवण्याचं राज ठाकरे यांचं भाजपाला आवाहन
मुंबई :मुंबईत अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरले.
या निवडणुकीत मनसेची भूमिका काय असेल यांच्याकडे सर्वाचं लक्ष लागलं होत. अंधेरी-पूर्व विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपानं निवडणूक लढवू नये, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज पत्र लिहिलं आहे.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाल्यानं तिथं पोटनिवडणूक होत आहे. दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं मनसेचं धोरण आहे.
त्यातून दिवंगत लोकप्रतिनिधीला आपण आदरांजलीच अर्पण करतो अशी आपली भावना आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतिशी सुसंगतही आहे. त्यामुळे ऋतुजा लटके आमदार होतील असं पहावं, असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.
याबाबत पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी बातमीदारांशी बोलताना दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपानं निवडणूक लढवू नये”