A one-day meeting of BJP state office bearers, district presidents and general secretaries of district organizations was held in Nagpur
भाजपाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा संघटन सरचिटणीसांची एक दिवसीय बैठक नागपूरात पार पडली
नवी दिल्ली : लोकसभेच्या २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत जिद्दीनं कामाला लागावं. सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवावीत आणि निवडणुकीत ५१ टक्के मते मिळविण्यासाठी संघटना बळकट करावी, असं आवाहन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी तसंच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केलं.
भाजपाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा संघटन सरचिटणीसांची एक दिवसीय बैठक नागपूर येथे आज झाली. आता राज्यात विकासाचं डबल इंजिन असलेलं सरकार आलं आहे. पण भाजपानं आत्मसंतुष्ट होण्याचं कारण नाही. आपला संघर्ष अजूनही चालू आहे. सरकारच्या योजना समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे असं सी. टी. रवी म्हणाले.
भाजपाचे हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि विकास हे धोरण आहे. हिंदुत्व हा केवळ भाजपाचा नाही तर देशाचा आत्मा आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांचा प्रवास करताना आपल्याला आढळलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेमध्ये पक्षासाठीचा पाठिंबा वाढला असून कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकीत जिथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उमेदवार असतील तिथेही भाजपा संघटनेचा पाठिंबा त्यांना उपयोगी पडेल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com