BJP wins eight out of 16 Rajya Sabha seats while Congress bags five seats
चार राज्यांतील राज्यसभेच्या १६ पैकी ८ जागांवर भाजपाचा, तर काँग्रेसचा पाच जागांवर विजय
नवी दिल्ली : चार राज्यांतील १६ पैकी ८ राज्यसभेच्या जागांवर भाजपानं विजय नोंदवला, तर काँग्रेसनं अत्यंत चुरशीच्या लढतीत पाच जागा जिंकल्या. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत काल महाराष्ट्रातील सहा जागांसाठी, कर्नाटक आणि राजस्थानमधील प्रत्येकी चार आणि हरियाणामधील दोन जागांसाठी काल मतदान झालं. चारही राज्यांचे निकाल आज पहाटे जाहीर झाले.
क्रॉस व्होटिंग आणि नियमांचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारींमुळे हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये आठ तासांहून अधिक काळ मतमोजणी थांबवण्यात आली होती. मतमोजणी लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीनं सहापैकी तीन जागा जिंकल्या, तर भाजपाला तीन जागा मिळाल्या.
भाजपाच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी राज्यमंत्री अनिल बोंडे आणि पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी आणि शिवसेनेचे संजय राऊत हेही राज्यसभेवर निवडून आले आहेत.
नियमांच उल्लंघन केल्याचा आरोप करत भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. सहाव्या जागे साठी भाजपाच्या धनंजय महाडिक आणि शिवसेनेच्या संजय पवार यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली होती. निकाला जाहीर झाला तेव्हा महाडिक यांना ४१ आणि पवार यांना ३९ मतं मिळाली.
हरियाणात, भाजपचे उमेदवार कृष्णलाल पनवार आणि अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा, पक्ष आणि त्याचा मित्र JJP यांनी समर्थित, राज्यसभेच्या दोन जागा जिंकल्या आहेत.
कर्नाटकात भाजपला तीन तर काँग्रेसला एक जागा मिळाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अभिनेता-राजकारणी जगेश आणि MLC लहरसिंग सिरोया हे भाजपकडून राज्यसभेवर निवडून आले आहेत, तर काँग्रेसचे जयराम रमेश यांनी उर्वरित एका जागेवर विजय मिळवला आहे. काँग्रेसचे मन्सूर अली खान आणि जेडीएसचे उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांना पुरेशी मते मिळवता आली नाहीत.
राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चारपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या, तर एक जागा भाजपने जिंकली. काँग्रेसकडून रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी हे विजयी झाले. घनश्याम तिवारी यांनी राज्यात भाजपला एक जागा मिळवून दिली.
पुढील महिन्यात होणार्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. 15 राज्यांमधील उच्च सभागृहातील 57 जागा भरण्यासाठी राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुका घेण्यात आल्या. त्यापैकी विविध राज्यांतील विविध पक्षांचे ४१ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत
नवनिर्वाचित उमेदवारांमध्ये उत्तर प्रदेशातील 11, तामिळनाडूतील सहा, बिहारमधील पाच, आंध्र प्रदेशातील चार, मध्य प्रदेश आणि ओडिशातील प्रत्येकी तीन, छत्तीसगड, पंजाब, तेलंगणा आणि झारखंडमधील प्रत्येकी दोन आणि उत्तराखंडमधील एकाचा समावेश आहे.
या 41 जागांपैकी भाजपने 14 जागा जिंकल्या- उत्तर प्रदेशमधून आठ, बिहार आणि मध्य प्रदेशमधून प्रत्येकी दोन आणि झारखंडमधून एक, उत्तराखंडमधून एक.
हडपसर न्युज ब्युरो