औरंगाबादमध्ये बोगस सोयाबीन बियाणं जप्त

Hadapsar Info Media

Bogus soybean seeds seized in Aurangabad

औरंगाबादमध्ये बोगस सोयाबीन बियाणं जप्त

औरंगाबाद: औरंगाबाद शहरानजीकच्या वाळूज मधल्या जोगेश्वरी हद्दीत असलेल्या ओम पॅक इंडस्ट्रीज या कंपनीतून काल कृषी विभागाच्या पथकानं १६ लाख रुपये किमतीचं बोगस सोयाबीन बियाणं जप्त केलं.

पोलीसांना याबाबत माहिती मिळाल्यानं कृषी विभागाशी संपर्क साधून पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ३ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान वाळूज मधल्या लांजी रोडवरच्या औषधी दुकानांमधून काल नशेच्या गोळ्यांचा मोठा साठा पोलीसांनी जप्त केला. या गोळ्यांची किंमत ३ लाख ३७ हजार रुपये आहे. या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारासह त्यांची अवैध विक्री करणाऱ्या ३ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

किडनाशक अंशमुक्त फळे भाजीपाला उत्पादनांची शेतकऱ्यांनी ट्रेसिबिलीटीनेटव्दारे नोंदणी करण्याचं आवाहन बीड जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केलं आहे.

कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे ‘सुरक्षित अन्न पिकवा’ योजनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अपेडाच्या मार्गदर्शनाखाली विविध फळ पिकांसाठी फ्रुटनेट सुविधा उपलब्ध असल्याचं ते म्हणाले.

हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *