Bombay High Court refuses to hear ED’s plea to cancel MP Sanjay Raut’s bail
खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठीच्या ईडीच्या याचिकेवर सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली : पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका असलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडी, अर्थात सक्तवसुली संचलनालयानं याचिका दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
गोरेगावच्या पत्रा चाळ कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं संजय राऊत यांना अटक केली होती. सुमारे तीन महिने अटकेत असणाऱ्या राऊत यांना ९ डिसेंबर रोजी पीएमएलए न्यायालयानं जामीन मंजूर केला. या जामिनाला स्थगिती मिळावी, यासाठी ईडीनं तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, उच्च न्यायालयानं याप्रकरणी तातडीची सुनावणी घेण्याची मागणी फेटाळून लावली होती.
त्यानंतर ईडीनं आपल्या याचिकेत काही सुधारणा करत पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र आज न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठानं त्यावर सुनावणी घ्यायला नकार दिला.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायमूर्ती कर्णिक यांच्यासमोर याचिकेचा उल्लेख केला आणि तातडीची सुनावणी घेण्याची मागणी केली कारण ती दैनिक बोर्डावर अनुक्रमांक 101 वर सूचीबद्ध होती आणि शुक्रवारी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता नव्हती. तथापि, न्यायमूर्ती कर्णिक यांनी मुंबईच्या उत्तर उपनगरातील पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित प्रकरणात ईडीच्या अर्जावर सुनावणी घेण्यास साफ नकार दिला
ईडी अधिक दिलासा मिळावा यासाठी उच्च न्यायालयाच्या पर्यायी खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com