Brass sand will be available for 600 rupees
६०० रुपयात मिळणार एक ब्रास वाळू
राज्यात आजपासून नवीन वाळू धोरण लागू
श्रीरामपूर: राज्यातल्या पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचं उद्घाटन आणि वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचं लोकार्पण अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातल्या नायगांव इथं महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या हस्ते आज झालं. राज्यातील जनतेला आजपासून अतिशय स्वस्तात घरपोच वाळू मिळणार आहे. वाळू तस्करीला लगाम लावण्याबरोबरच गुंडगिरी मोडीत काढली जाणार आहे.
सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकारनं घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी आहे, असं ते यावेळी म्हणाले. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात एक ब्रास वाळू दिली जाणार असून जास्तीत जास्त १० ब्रास घरपोच वाळू दिली जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या जमिनीची जून अखेर शंभर टक्के मोजणी करून घरपोच नकाशे दिले जाणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
वाळू वाहतूक पारदर्शी होणार
या वाळू धोरणामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाचा त्रास कमी होणार आहे. जीपीएस सिस्टीममुळे वाळू वाहतूक पारदर्शी होईल. आरटीओ मान्यता प्राप्त वाहनांनाच वाळू वाहतूक परवाना मिळेल. वाळू कमी दराने मिळणार असल्याने ग्राहकांचा बांधकाम खर्च कमी होणार आहे. सामाजिक सुरक्षितता आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन सुरक्षित होणार आहे.
राज्यात आजपासून नवीन वाळू धोरण लागू झालं. ६०० रुपयांत एक ब्रास वाळू मिळणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला.
राज्यात वाळू माफियांची गुन्हेगारी वाढली होती. सामान्य व्यक्तीला कमी दरात वाळू मिळत नव्हती. वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती. त्यावर राज्याने हे नवीन धोरण जाहीर केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com