केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलचं अनावरण

Broadcast Seva Portal for broadcasters Launched by Shri Anurag Thakur

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलचं अनावरण

नवी दिल्‍ली : नव भारताच्या निर्मितीत डिजिटल इंडियाचं महत्वपूर्ण योगदान असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतBroadcast Seva Portal for broadcasters Launched by Shri Anurag Thakur, हडपसर मराठी बातम्या , Hadapsar Latest News, Hadapsar News ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलचं अनावरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.

प्रधानमंत्र्यांच्या डिजिटल भारता योजनेमुळे प्रशासन कार्यात पारदर्शकता आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

या पोर्टलचा लाभ उपग्रह वाहिन्या,एफ एम वाहिन्या तसंच कम्युनिटी रेडीओ स्टेशन यांना होईल, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी व्यवसाय सरलता यावी या उद्देशानं सुरु केलेल्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यासारख्या योजना अंतर्गत हे पोर्टल सुरु करण्यात आलं आहे.

हे सेवा पोर्टल वाहिन्यांना आवश्यक असणारी परवानगी, नोंदणी तसंच परवाना एकाच ठिकाणी उपलब्ध करु देणार आहे.
या पोर्टलच्या चाचणीला वापरकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. या पोर्टलला लवकरच राष्ट्रीय एक खिडकी प्रणालीला (NSWS) जोडण्यात येणार असून वापरकर्त्यांनी त्यामध्ये काही सुधारणा सुचवल्यास त्यावर विचार केला जाईल असेही ते म्हणाले.

या पोर्टलच्या एक महिनाभर चाललेल्या चाचणी दरम्यान वापरकर्त्यांनी सुचवलेल्या सुधारणांना लक्षात घेऊन आधीच्या आवृत्तीत अनेक बदल केले गेले असल्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितले.

या पोर्टलमुळे परिसंस्थेत पारदर्शकता, जबाबदारी व प्रतिसादशीलता वाढीस लागेल. सर्व माहिती एकाच डॅशबोर्ड वर उपलब्ध असेल. या पोर्टलची काही वैशिष्ट्ये व सुविधा :

सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व प्रक्रिया अंतर्भूत
शुल्क भरण्यासाठी ‘भारत कोष’ या यंत्रणेशी समन्वय
इ ऑफिस व हितधारक मंत्रालयाशी समन्वय
विश्लेषण, माहिती संकलन व व्यवस्थापन माहिती यंत्रणा ( MIS)
एकीकृत हेल्पडेस्क
आवेदने व सद्यस्थिती पाहणी
पत्रे व आदेश पोर्टलमधूनच थेट डाउनलोड करण्याची सोय
एस एम एस अथवा इ मेल मार्फत हितधारकांशी संपर्क

या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व प्रक्षेपकांनी या पोर्टलच्या प्रारंभाचे स्वागत केले व आवेदनांच्या प्रक्रियेला लागणारा वेळ व त्रास या पोर्टलमुळे नक्कीच कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

Hadapsar News Bureau.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *