This year’s budget is comprehensive and progressive
यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील आहे
– मंत्री नितीन गडकरी
हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
नवी दिल्ली : यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. देशाला नव्या जगाच्या पायाभूत सुविधा देणारा हा अर्थसंकल्प असून आयात कमी करुन ऊर्जा क्षेत्राला उभारी देणारा आहे असंही ते म्हणाले.
हा अर्थसंकल्प एक समृद्ध आणि समावेशी भारताची परिकल्पना करतो, ज्यात सर्व समाजघटकांना विशेषतः युवक, महिला, शेतकरी, ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना पोहोचणार असल्याचे म्हटले आहे.
देशाला स्वयंपूर्णतेच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प देशातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ घडवून आणेल, आयात कमी करेल आणि भविष्यकालीन दृष्टिकोन समोर ठेऊन आपले ऊर्जा क्षेत्राला बळकटी देणारा असल्याचे गडकरी म्हणाले.
यंदाचा अर्थसंकल्प हा भविष्याचा वेध घेणारा असून तो पर्यावरण पूरक आहे. मध्यमवर्गीयांचा, युवकांचा विचार करुन त्यांना शक्ती देणारा आहे अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी आपल्या ट्विट संदेशात दिली आहे. करोडो भारतीयांचे जीवन सहज करणारा हा अर्थसंकल्प असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरामध्ये दिलासा दिला असला तरी वाढती महागाई रोखण्यासाठी भरीव पावलं उचललेली नाहीत. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे.
आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले तरी त्याचा सर्वसामान्य ग्राहकांना लाभ देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे, असंही ते म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com