Businessman arrested for submitting fake bills worth Rs 37 crore to GST department
जीएसटी विभागाला 37 कोटी रुपयांची बनावट बिले सादर करणाऱ्या उद्योजकाला अटक
मुंबई : वस्तू व सेवा कर विभागाला 37 कोटी रुपयांची खोटी बिले देऊन सुमारे 6 कोटी 70 लाख रुपयांची वजावट प्राप्त केल्याप्रकरणी नाशिकच्या अस्तित्व मेटलचे संचालक सुनील अमृतलाला तुलसानी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 14 दिवसापर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या नाशिक येथील अन्वेषण विभागातील सह आयुक्त हरिश्चंद्र गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
खोटी बिले देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या कंपन्या या विभागाच्या रडारवर असून त्या अंतर्गत या विभागांना अस्तित्व मेटल्स या कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी अन्वेषण पथकाने केली होती यावेळी कंपनीचे संचालक सुनील अमृतलाल तूलसनी यांनी हवाला कर दात्याकडून कर वजावटीचा दावा केला होता.
प्रत्यक्षात खरेदी न करता खोटी बिले देऊन बनावट कर वजावटीचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी बनावट कंपन्यांकडून 37 कोटी 24 लाख रुपयांची बिल सेवा कर विभागाला दिली होती आणि त्यातून सहा कोटी सत्तर लाख रुपयांची वजावट प्राप्त केली होती. बिले तपासणीत हा प्रकार आढळल्यानंतर कारवाई करण्यात आल्याचे सहआयुक्त हरिश्चंद्र गांगुर्डे यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com