60 कोटी रुपयांच्या बनावट देयकांकरील कर फसवणूक प्रकरण उघड

GST Mumbai busts tax fraud on bogus bills of around Rs.60 Crore

सीजीएसटी मुंबईने केलेल्या कारवाईत सुमारे 60 कोटी रुपयांच्या बनावट देयकांकरील कर फसवणूक प्रकरण उघड

मुंबई : सीजीएसटी आयुक्तालय, मुंबई  पश्चिम क्षेत्राने बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) टोळीच्या फसवणुकीचे प्रकार उघड करत वर्सोवा येथील एका कंपनीच्या मालकाला अटकGST Council Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या केली.

सीजीएसटी मुंबई क्षेत्राला  केंद्रीय गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे  कारवाई करताना, लोहयुक्त धातू (फेरस मेटल) आणि भंगाराचा व्यापार करणाऱ्या मेसर्स एनइसीआयएल  मेटल डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध तपास सुरू करण्यात आला.

सीजीएसटी कायदा, 2017 च्या तरतुदींचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करून, माल प्राप्त किंवा मालाचा  पुरवठा न करता 10.01 कोटी रुपयांचे जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी  ) फसवणूक करून मिळवण्यात आणि आणि ते मंजूर करण्यात ही कंपनी गुंतलेली होती.

या कर फसवणुकीसाठी सुमारे 60 कोटींची बोगस देयके जारी करण्यात आली होती.या कंपनीच्या एका संचालकाला जानेवारी 2022 मध्ये अटक करण्यात आली होती, मात्र दुसरा संचालक फरार होता.11.05.22 रोजी त्याला शोधण्यात आले  आणि त्याचा जबाब नोंदवण्यात आला.  त्यात त्याने कर फसवणुकीत आपली भूमिका असल्याचे कबूल   केले.

सीजीएसटी  कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत त्याला अटक करण्यात आली आणि 11.05.2022 रोजी माननीय अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लानेड यांच्यासमोर हजर करण्यात आले.न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे.

हे प्रकरण ,सीजीएसटी  मुंबई क्षेत्राने  बनावट आयटीसी नेटवर्क आणि कर चुकवेगिरी करणाऱ्यांना शोधून  काढण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे.या मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबई पश्चिम आयुक्तालयाने 465 कोटी रुपयांची बनावट  इनपुट टॅक्स क्रेडीट उघडकीस आणले आहेत  आणि 35 कोटी रुपये वसूल केले आहेत  आणि गेल्या सहा महिन्यांत  करचोरी करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

संभाव्य फसवणूक करणाऱ्यांना ओळखण्यासाठी सीजीएसटी अधिकारी माहिती  विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधने वापरत आहेत.हा विभाग या आर्थिक वर्षात करचोरी करणाऱ्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करणार आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *