कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुक जाहीर

Election Commision of India

By-elections announced for Kasba Peth and Chinchwad assembly constituencies

कसबा पेठ आणि चिंचवड  विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुक जाहीर

महाराष्ट्रातल्या कसबा पेठ आणि चिंचवड या २ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुक जाहीर

नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयातल्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या कसबा पेठ आणि चिंचवड या २ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुक निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे , लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाल्या होत्या.Election Commision of India

निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या कसबा पेठ आणि चिंचवड या २ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकाही जाहीर केल्या. या ठिकाणीही ७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येईल आणि २७ फेब्रुवारीला मतदान होईल.

अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ७ फेब्रुवारी तर ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तर २ मार्च रोजी मतमोजणी होईल. ३१ जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल.

भाजपाच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक तसेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या. कोणत्याही आमदार वा खासदाराचे निधन झाल्यास विरोधकांकडून त्या जागेवर उमेवार उभा केला जात नाही. त्या जागेवर बिनविरोध निवडणूक पार पडते. तसा महाराष्ट्रात प्रघात आहे. त्यामुळे या दोन जागांवरील निवडणूक बिनविरोध पार पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयातल्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर

निवडणूक आयोगाने मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांच्या एकाच टप्प्यातील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. 60 सदस्य असलेल्या त्रिपुरा विधानसभेसाठी 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर 60 सदस्य असलेल्या मेघालय आणि नागालँड विधानसभेसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

या सर्व राज्यांसाठी 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. त्रिपुरा विधानसभेसाठी २१ जानेवारीला तर मेघालय आणि नागालँडसाठी ३१ जानेवारीला अधिसूचना जारी केली जाईल.

निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या तीन राज्यांमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि हिंसामुक्त निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.

ते म्हणाले, एकूण मतदान केंद्रांपैकी 376 मतदान केंद्र पूर्णपणे महिला कर्मचारी सांभाळतील. सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे यासारख्या किमान मूलभूत सुविधांची हमी दिली जाईल. निवडणूक आयोगाने शाळांमध्ये पिण्याचे पाणी, वीज आणि रॅम्पची कायमस्वरूपी रचना करण्याचाही आग्रह धरला आहे, जेणेकरून आयोगाने निवडणुका घेतल्यावर वेळोवेळी आढावा घेण्याची गरज भासू नये. या राज्यांमध्ये रोखीचा ओघ रोखण्यासाठी अंमलबजावणी संस्थांना सूचना देण्यात आल्या आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये निमलष्करी दले आधीच दाखल झाली आहेत.

मेघालय विधानसभा मतदारसंघाची मुदत 15 मार्च, नागालँड विधानसभा मतदारसंघाची मुदत 12 मार्च आणि त्रिपुरा विधानसभा मतदारसंघाची मुदत 22 मार्च रोजी संपत आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *