Former Secretary of Popular Front of India Prohibited Organization C. A. Rauf arrested from Kerala
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया प्रतिबंधित संघटनेचा माजी सचिव सी. ए. रौफला केरळातून अटक
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडूनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया प्रतिबंधित संघटनेचा माजी सचिव सी. ए. रौफला केरळातून अटक
पलक्कड: राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया प्रतिबंधित संघटनेचा माजी सचिव सी. ए. रौफ याला काल केरळातून अटक केली. केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत PFI आणि त्याच्या आठ संलग्न संस्थांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली होती.
पीएफआयवर गेल्या सप्टेंबरमधे बंदी लागू झाल्याच्या निषेधार्थ त्याने पुकारलेल्या बंदमधे केरळात सरकारी आणि खासगी मालमत्तेचं खूप नुकसान झालं होतं.
गेल्या महिन्यात, केंद्रीय एजन्सीने देशभरातील पीएफआय परिसरावर छापे टाकले आणि संघटनेच्या अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांना अटक केली. छापे मारल्यानंतर काही दिवसांनी ही बंदी आली. रौफला पकडण्यात असमर्थ ठरल्याने एनआयएने त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली होती.
त्यानंतर तो फरार झाला होता. तो घरी परत आल्याची खबर मिळाल्यावरुन एनआयएने पलक्कड जिल्ह्यात पट्टांबी इथं त्याच्या घराला वेढा घालून ही कारवाई केली. त्याला पुढच्या चौकशीसाठी कोच्चीला नेलं आहे.
केरळ पोलिसांनी यापूर्वी राज्याचे आणखी एक नेते अब्दुल सतार यांना हरताळशी संबंधित हिंसाचार प्रकरणी अटक केली होती.
हायकोर्टाने केरळमधील सर्व अधीनस्थ न्यायालयांना निर्देश दिले होते की अटक केलेल्या पीएफआय लोकांना त्यांनी हरताळ दरम्यान मालमत्तेच्या नुकसानीसाठी पैसे जमा केल्यानंतरच जामीन मंजूर करावा.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com