Call for submission of Gymnasium and Playground Development Grant Scheme proposal by 31st August
व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजना प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका व पात्र विभागांनी व्यायामशाळा विकास व क्रीडांगण विकास अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत राबवण्यात येत असलेल्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेची अनुदान मर्यादा कमाल ७ लाख इतकी करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत व्यायामशाळा विकास अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शासकीय विभाग, आदिवासी व समाजकल्याण विभागातंर्गत शासकीय आश्रमशाळा व स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांना खुली व्यायामशाळा साहित्य व व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी ७ लाख रूपयांच्या मर्यादेत व्यायामसाहित्याचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे.
अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत ज्या गावांत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये व्यायामशाळा उपलब्ध असेल तेथे व्यायामसाहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच दलित वस्ती किंवा वस्तीच्या नजीकच्या परिसरात सुयोग्य मोकळी जागा उपलब्ध असेल तर खुले व्यायामशाळा साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दलित वस्तीमध्येच व्यायामसाहित्य बसविण्याबाबतचा ठराव ग्रामपंचायतींना द्यावा लागणार आहे.
अदिवासी उपयोजनेतंर्गत अदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायती व अदिवासी शाळा तसेच अदिवासी क्षेत्रालगत ग्रामपंचायती व शाळांना व्यायामसाहित्य व खुली व्यायामशाळा साहित्य व क्रीडासाहित्य पुरवठा करण्याची योजना आहे.
क्रीडांगण विकास अनुदान योजनेतंर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शासकीय विभाग, अदिवासी व समाजकल्याण विभागा तंर्गत शासकीय आश्रमशाळा व स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका अंतर्गत शाळांना ३ लाख रूपयांच्या मर्यादेत विविध खेळांचे क्रीडासाहित्य पुरवठा करण्याचे नियोजन आहे.
पात्र विभागानी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, द्वारा स.नं. १९१, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे हायस्कूल समोर येरवडा येथे उपलब्ध विहित नमुन्यातील अर्जासह ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. अर्ज तसेच अधिक माहितीसाठी www.dsopune.com या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन श्री. कसगावडे यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com