केंद्रीय अर्थसंकल्पासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयानं मागवल्या नागरिकांकडून सूचना

Union Finance Minister Nirmala Sitharaman हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Union Finance Ministry has called for suggestions from citizens till December 10 for the Union Budget for the financial year 2023-24

आर्थिक वर्ष २०२३-२४च्या केंद्रीय अर्थसंकल्पासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयानं मागवल्या १० डिसेंबरपर्यंत नागरिकांकडून सूचना

नवी दिल्ली : 2023-24 च्या अर्थसंकल्पासाठी 21 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आभासी माध्यमातून सल्लामसलत बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या अर्थसंकल्पपूर्व बैठका आज संपल्या.

या कालावधीत झालेल्या  8 बैठकांमध्ये 7 भागधारक गटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 110 हून अधिक निमंत्रित सहभागी झाले होते.  भागधारक गटांमध्ये कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योग, उद्योग, पायाभूत विकास  आणि हवामान बदल; वित्तीय  क्षेत्र आणि भांडवली बाजार; सेवा आणि व्यापार; सामाजिक क्षेत्र; व्यापार  संघटना आणि कामगार संघटनाचे प्रतिनिधी आणि तज्ञ, अर्थशास्त्रज्ञ यांचा समावेश होता.

भागधारक गटांच्या प्रतिनिधींनी आगामी अर्थसंकल्पासाठी अनेक सूचना केल्या, यात एमएसएमईंना मदत करण्यासाठी हरित प्रमाणीकरण यंत्रणा, शहरी भागात रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शहरी रोजगार हमी कार्यक्रम, प्राप्तिकर सुसूत्रीकरण,अभिनव क्लस्टर्सची निर्मिती, देशांतर्गत पुरवठा साखळी  सुधारण्यासाठी योजना,  इलेक्ट्रिक वाहनावरील कर कमी करणे, या वाहनांसाठी  धोरण आणणे  , ग्रीन हायड्रोजनचे केंद्र म्हणून भारताला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना, सामाजिक प्रभाव असलेल्या कंपन्यांसाठी सामाजिक क्षेत्र उद्योजकता निधी, सेवा आणि काळजी घेणाऱ्या केअर इकॉनॉमी कामगारांचे प्रशिक्षण आणि मान्यता, मुलांसाठी पोर्टेबल सामाजिक लाभ, पाणी आणि स्वच्छता यासाठी राष्ट्रीय नियामक प्राधिकरण , ईएसआयसी अंतर्गत असंघटित कामगारांना संरक्षण , सार्वजनिक भांडवली खर्च चालू ठेवणे, वित्तीय एकत्रीकरण आणि सीमा शुल्क कपात ,इत्यादींचा समावेश आहे.

जन भागीदारी’ला चालना देण्यासाठी, सरकार दरवर्षी नागरिकांकडून सूचना मागवतात. जेणेकरून अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सर्वार्थानं सर्वसमावेशक बनते.

Union Finance Minister Nirmala Sitharaman हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

यावर्षीही केंद्रीय वित्त मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पासाठी १० डिसेंबरपर्यंत नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत.‘ mygov.in ’ या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, नागरिकांकडून मिळालेल्या कल्पना आणि सूचना भारताला सर्वसमावेशक वाढीसह जागतिक आर्थिक परिवर्तनासाठी मदत करू शकतात.

मंत्रालयान म्हटलं आहे की, भूतकाळात सामायिक केलेल्या अनेक सूचनांचा वार्षिक अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे.

मौल्यवान सूचना सामायिक केल्याबद्दल अर्थमंत्र्यांनी सहभागी झालेल्यांचे आभार मानले आणि 2023-24 चा अर्थसंकल्प तयार करताना या सूचनांचा काळजीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन दिले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *