Caricature Drawing Competition at Museum of Cartoon Art, SPPU.
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त विद्यापीठात व्यंगचित्रकला स्पर्धा
लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सहभागी होण्याची संधी
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यंगचित्रकला संग्रहालयातर्फे ५ मे २०२३ रोजी होणाऱ्या जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त व्यंगचित्र (कॅरिकेचर) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वजण सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुर्वनोंदणी आवश्यक आहे. वय वर्षे ८ ते १६ यांचा एक गट तर १६ वर्षापासून पुढील सर्व अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. इच्छुकांनी २ मे पर्यंत ८७६६६८७४६८ या क्रमांकावर फोन करत नाव नोंदवायचे आहे. यासाठी मर्यादित नोंदणी असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत ५ मे रोजी होणाऱ्या छोटेखानी कार्यक्रमात ही स्पर्धा होणार असून यासाठीचा विषय संग्रहालय ऐनवेळी देणार आहे. त्याच दिवशी विजेते जाहीर होणार असून त्यांना रोख स्वरूपात बक्षीसही देण्यात येईल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com