Cartoon Exhibition at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यंगचित्र प्रदर्शन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील व्यंगचित्रकला संग्रहालयात, १० डिसेंबर रोजी व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. युवा व्यंगचित्रकार मैथिली पाटणकर यांच्यासोबत पूर्णवेळ व्यंगचित्र या विषयासाठी आपले योगदान देणारे चैतन्य गोवंडे यांच्या कलाकृती यावेळी प्रदर्शित केल्या जातील.
हे प्रदर्शन व्यंगचित्रकला संग्रहालयात शनिवारी सकाळी ११ ते १ या दरम्यान भरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन विनामूल्य असणार आहे.
ज्या व्यंगचित्रकारांना पुढील काळात आपल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्याची इच्छा आहे अशा व्यंगचित्रकारांनी museum.unipune@gmail.com या मेल आयडीवर संपर्क करावा.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com