मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

CBI files case against former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल

मुंबई : सीबीआयनं एक खासगी कंपनी, तिचे तत्कालीन संचालक आणि इतर अधिकारी, तसंच राष्ट्रीय शेयर बाजाराचे चार अधिकारी आणि इतर अज्ञातांविरुद्ध आजमुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे  Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News गुन्हा दाखल केला.

यातील मुख्य आरोपींमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, आणि NSE, अर्थात राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी व्यवस्थापकीय संचालक रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण यांचा समावेश आहे.

सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि एनएसईच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या विरुद्ध शेअर बाजारातील कर्मचार्‍यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.

२००९ ते २०१७ या कालावधीत NSE च्या उच्च व्यवस्थापनानं खाजगी कंपनीच्या संगनमतानंबेकायदेशीररित्या कर्मचार्‍यांचे फोन टेपिंग केल्याचा संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशावरून ही कारवाई केली आहे.

NSE च्या उच्च अधिकार्‍यांनी बेकायदेशीररित्या कर्मचार्‍यांचे फोन टेप केले, असा आरोप त्यांच्यावर आहे. या कॉल्सच्या ट्रान्स्क्रिप्ट्स खाजगी कंपनीने NSE च्या वरिष्ठ अधिकार्‍यांना पुरवल्या होत्या आणि यासाठी अंदाजे ४ कोटी ४५ लाख रुपये या खाजगी कंपनीला दिल,असाही आरोप आहे.

आयसेक सिक्युरिटीज प्रा.लि. NSE चे सिक्युरिटी ऑडिट करणार्‍या काही इतरांपैकी एक फर्म लिमिटेड, 2009-17 मध्ये NSE कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले होते, असे CBI ने म्हटले आहे

मार्च 2001 मध्ये पांडे यांनी कंपनीची स्थापना केली आणि मे 2006 मध्ये त्यांनी संचालकपद सोडले. नंतर त्यांच्या मुलाने आणि आईने कंपनीची जबाबदारी स्वीकारली.

आयआयटी-कानपूर आणि हार्वर्ड विद्यापीठात शिकलेल्या या पोलीस अधिकाऱ्याने सेवेचा राजीनामा दिल्यानंतर कंपनीची स्थापना केल्याचे समजते.

त्यांचा राजीनामा राज्य सरकारने स्वीकारला नाही आणि ते पुन्हा रुजू झाले पण त्यांना लगेच पद देण्यात आले नाही.

सीबीआयनं आज संजय पांडे यांच्या घरावर आणि मुंबई, पुणे, कोटा, लखनौ आणि दिल्ली एनसीआर अशा देशभरातल्या १८ ठिकाणांवर छापे मारले. संजय पांडे घरातून बेपत्ता असून, सीबीआय शोध घेत आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

2 Comments on “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *