CBI summons Telangana CM’s daughter K Kavitha in Delhi liquor policy scam case
अबकारी करप्रकरणात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची कन्या कविताला चौकशीसाठी सीबीआयचे समन्स
नवी दिल्ली : केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं अबकारी करप्रकरणात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची कन्या कविताला चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. त्यांना या मंगळवारी दिल्ली किंवा हैद्रबाद मध्ये चौकशी साठी बोलावण्यात आलं आहे.
सीबीआय दिल्लीत अबकारी कर धोरण तयार करण्याच्या आम आदमी पक्षाच्या धोरणाची चौकशी करत आहे.
CBI आम आदमी पक्षाच्या सरकारद्वारे दिल्ली उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणी करण्यात कथित अनियमिततेची चौकशी करत आहे. तेलंगणा विधान परिषदेच्या सदस्य असलेल्या कविता यांचे नाव ‘दक्षिण ग्रुप’च्या सदस्यांपैकी एक म्हणून देण्यात आले आहे.
तेलंगणा विधानपरिषदेच्या सदस्य असलेल्या कविता या साऊथ ग्रुप च्या सदस्य आहेत. या प्रकरणी अटकेत असलेले व्यवसायिक विजय नायर यांनी साऊथ ग्रुप मधून आम आदमी पक्षासाठी शंभर कोटी रुपयाची लाच घेतली होती.
दरम्यान कविता यांनी हैद्राबाद इथं आपल्या निवासस्थानी भेटणार असल्याचं सीबीआयला कळवलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com