Central Board of Secondary Education 12th result declared
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर
सीबीएसई परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रधानमंत्र्यांनी केले अभिनंदन
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी इयत्तेच्या परीक्षेचे निकाल आज जाहीर करण्यात आले. देशभरातुन १४ लाख ३५ हजार ३६६ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९२ पूर्णांक ७१ शतांश विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधील मुलांचं प्रमाण ९१ पूर्णांक २५ शतांश असून मुलींच प्रमाण ९४ पूर्णांक ५४ शतांश आहे.
या निकालातले ३० टक्के गुण पहिल्या सत्राचे असून ७० टक्के गुण दुसऱ्या सत्राचे मोजले असल्याचं मंडळानं म्हटलं आहे.
यावेळी ३३ हजाराहून जास्त विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत तर १ लाख ३४ हजार विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून जास्त गुण कमावले आहेत.
सीबीएसई परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रधानमंत्र्यांनी केले अभिनंदन
इयत्ता १२वी च्या सीबीएसई परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. या तरुणांची जिद्द आणि समर्पण वाखाणण्याजोगे आहे,असं ही त्यांनी सांगितलं.
वेगवेगळ्या ट्विट्सद्वारे मोदी म्हणाले की, त्यांनी परीक्षेची तयारी अशा काळात केली जेव्हा मानवतेला एका महत्त्वपूर्ण आव्हानाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी मिळवलेले यश हे अद्वितीय आहे.
१२वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी असंख्य संधीं वाट बघतायेत. मोदींनी त्यांना त्यांच्या आंतरिक आवाहनाचे पालन करण्याचे आणि त्यांना ज्या विषयांची आवड आहे त्या विषयांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.
काही विद्यार्थी त्यांच्या निकालावर खूश नसतील, परंतु त्यांना हे माहित असले पाहिजे की एक परीक्षा ते कोण आहेत हे कधीही ठरवू शकत नाही. आगामी काळात त्यांना आणखी यश मिळेल याची मला खात्री आहे, असे ही मोदी म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com