CBSE Class 10th and 12th Exam Result Declared
सी बी एस ई चा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर
नवी दिल्ली : सी बी एस ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.
बारावीच्या परीक्षेत जवळपास ८७ पूर्णांक ३३ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. या परीक्षेत एकूण ९० पूर्णांक ६८ शतांश टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांचा निकाल ८४ पूर्णांक ६७ शतांश टक्के लागला आहे.
त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक ९९पूर्णांक ९१ शतांश टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी ९३ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे. तर बंगळुरु (कर्नाटक) आणि चेन्नई (तामिळनाडू) अनुक्रमे ९८.६४%, ९७.४०% सह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. तर दिल्ली पश्चिम (९३. २४%) चौथ्या आणि चंदीगड (९१.८४%) पाचव्या क्रमांकावर आहेत.
मुलींचा निकाल ९४ पूर्णांक २५ शतांश टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल ९२ पूर्णांक २७ शतांश टक्के लागला आहे. विद्यार्थी त्यांचे निकाल मंडळाच्या, cbse.gov.in आणि results.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील पाहू शकतात.
मागील वर्षी सीबीएसई बोर्डात ९१.२५% मुले उत्तीर्ण झाली होती, तर यावर्षी फक्त ८४ . ६७% मुले उत्तीर्ण झाली आहे. गेल्या वर्षी ९४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या, तर यावर्षी केवळ ९०.६८ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजेच यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट झाली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com