Now give Central Armed Police Force Constable Exam in Marathi
आता मराठी मध्ये द्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात कॉन्स्टेबल पदासाठीची परीक्षा
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात कॉन्स्टेबल पदासाठी मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा घेण्यास मंजुरी दिली
नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात कॉन्स्टेबल पदासाठी १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला आहे. या दलांमध्ये स्थानिक तरुण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावेत आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकारानं, गृह मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे लाखो इच्छूक उमेदवार त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेत परीक्षा देऊ शकतील आणि त्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल.
कॉन्स्टेबल जीडी ही कर्मचारी निवड आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रमुख परीक्षांपैकी एक असून देशभरातून लाखो उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी उत्सुक असतात.
उमेदवारांना यापुढे ही परीक्षा, इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, उडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी या १३ प्रादेशिक भाषांमध्ये देता येईल.
हा निर्णय १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार असून त्यामुळे लाखो होतकरू तरुणांना आपल्या स्वतःच्या भाषेत परीक्षा देता येईल. ही परीक्षा कर्मचारी निवड आयोगातर्फे घेतली जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण निर्णय घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा घेण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये स्थानिक तरुणांच्या सहभागाला चालना देण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे लाखो इच्छूक उमेदवार त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेत परीक्षा देऊ शकतील आणि त्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल.
विविध भारतीय भाषांमध्ये परीक्षा आयोजित करणे सुलभ करण्यासाठी गृह मंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोग विद्यमान सामंजस्य कराराच्या परिशिष्टवर स्वाक्षरी करेल.
कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ही कर्मचारी निवड आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रमुख परीक्षांपैकी एक असून देशभरातून लाखो उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी इच्छुक असतात.
स्थानिक तरुणांना त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी यानिमित्ताने मिळत असून तिचा उपयोग करण्यासाठी आणि मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशाची सेवा करण्यात करिअर करण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांनी व्यापक मोहीम सुरू करणे अपेक्षित आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com